Pune Rural Police News | पोलीस असल्याची बतावणी करुन भंगार व्यावसायिकाला लुटणारी टोळी जेरबंद ! कारसह दोन गावठी पिस्तुले जप्त (Video)

Pune Rural Police

पुणे : Pune Rural Police News | नंबरप्लेट नसल्याने कार खरेदी करण्यास नकार देणार्‍या भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन पोलीस असल्याचा बनाव करुन पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणार्‍या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कार व दोन गावठी पिस्तुले, ८ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

https://www.instagram.com/p/DAkr04FJffZ

संतोष लक्ष्मण भंडलकर (वय ४२, रा. पणदरे, ता. बारामती), सुरेश अशोक राखपसरे (वय ३३, रा. कुंजीरवस्ती, मांजरी, ता. हवेली), शेखर सुभाष शिंदे (वय ३२, रा. सांगवी ता. बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुरज शंकर मदने (रा. माळेगाव, ता. बारामती), हरीभाऊ बबन खुडे, अशोक गणपत बनसोडे (दोघे रा. कुंजीरवस्ती, मांजरी ता. हवेली) यांचा शोध घेण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/DAkth_hpYBG

याप्रकरणी कुतुबुद्दीन सुभेदार शहा (वय ४०, रा. तांदुळवाडी, बारामती) यांचे वंजारवाडी येथील लोखंडे वस्तीत भंगार खरेदी विक्रीचे दुकान आहे. २३ सप्टेंबर रोजी ते दुकानावर असताना चार जण आले. त्यांच्याकडील पांढरे रंगाची आय २० कार विक्री करायची असल्याचे सांगितले. कारला कोणताही नंबर नसल्याने त्यांनी कार खरेदी करण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी करुन त्यास आय २० कारमध्ये बसवून घेतले. त्यांच्याजवळील मोबाईल व ८ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. तू चोरीचा माल खरेदी केला आहे. १५ लाख रुपये दे नाही तर तुला भिगवण पोलीस ठाण्यात घेऊन जाऊ असे आरोपींनी सांगितले.

https://www.instagram.com/p/DAkk8drJ6Sr

त्यानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने पिस्तुल काढून त्याचा धाक दाखवून ओरडायचे नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांना दौंड -नगर हायवे रोडने घेऊन जाऊन चिखली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ सोडून दिले. या घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली. फिर्यादीला ज्या रोडने नेण्यात आले. त्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासलो असताना पांढरे रंगाची आय २० कार आढळून आली. ही कार संतोष भंडलकर हा वापरत असून त्याने त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची बातमी मिळाली.

https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ

संतोष भंडलकर हा त्याच्या कारने साथीदारांसह सोलापूरकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सोलापूर हायवे लगत हिंगणगाव परिसरात सापळा रचून संतोष भंडलकर सह दोघांना पकडले. त्यांच्या चौकशीत इतरांची नावे निष्पन्न झाली.

https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk

सांगोला जत मार्गावरील शेगाव येथील सोनार व्यावसायिकाला लुटण्यासाठी ते जात असल्याचे सांगितले. सुरज मदने याने ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घरासमोर ट्रॅक्टर मिळाला असून त्या ट्रॅक्टरची कोठून चोरी केली याचा तपास सुरु आहे.
सुरज शंकर मदने हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील लोणंद, वाठार, भुईज,फलटण, सातारा शहर तसेच पुणे जिल्ह्यातील यवत, बारामती तालुका, बारामती शहर पोलीस ठाण्यात मिळून एकूण १५ गुन्हे दाखल आहे. तो सराईत ट्रॅक्टर चोर आहे. तसेच इतर आरोपींवरही प्रत्येकी दोन ते तीन गुन्हे असून सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

https://www.instagram.com/p/DAjErLWCf33

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड
यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीखक अविनाश शिळीमकर,
बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाह,
दत्ताजी मोहिते, राहुल गावडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, विनोद पवार,
अजय घुले, राजु मोमीण, अतुल डेरे, निलेश शिंदे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, धीरज जाधव, तुषार भोईटे,
सागर नामदास, बारामती पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस अंमलदार राम कानगुडे यांनी केली आहे. (Pune Rural Police News)

https://www.instagram.com/p/DAjDQ41i1QY

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed