Pune Rural Police News | पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणारी टोळी जेरबंद ! 17 गुन्हे उघडकीस, 15 लाखांचा ऐवज जप्त
पुणे : Pune Rural Police News | पुणे जिल्ह्यात भरदिवसा घरफोडी करणार्या चोरट्यांच्या टोळीला ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा (Pune LCB) आणि नारायणगाव पोलिसांनी (Narayangaon Police) जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून १९ तोळे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल असा १५ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.
https://www.instagram.com/p/DAaQKkYiI2A
गणेश गोवर्धन काळे (वय २४), मिलिंद इश्वर भोसले (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींनी त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर (PI Avinash Shilimkar), पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी (PI Rajendra Gavli) उपस्थित होते.
https://www.instagram.com/p/DAaOXAvigL6
मिलिंद भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध नगर, बीड, पुणे ग्रामीण भागात घरफोडी, जबरी चोरीचे १६ गुन्हे दाखल आहेत. जुलै २०२३ मध्ये शिरूर परिसरात पिस्तुलातून गोळीबार करून चोरी केली होती. मे २०२४ मध्ये तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आला होता. जिल्ह्यातील विविध भागात भरदिवसा घरफोडीचे प्रकार वाढले होते. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध नसल्याने पोलिसांना तपासात अडचण आली होती.
https://www.instagram.com/p/DAaMouwJF1z
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले कल्याण-नगर महामार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन निघाल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने महामार्गावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. नगर ओैद्योगिक वसाहतीपर्यंत पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला. त्यानंतर पोलिसांनी काळे आणि भोसले यांना सापळा लावून पकडले. आरोपींनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले.
https://www.instagram.com/p/DAaK9xAi7Qm
नारायणगाव २, वडगाव निंबाळकर २, बारामती शहर २, वालचंदनगर २, मंचर २, माळेगाव, खेड, शिरुर, आळेफाटा, यवत, सुपा, उरुळी कांचन असे १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.
https://www.instagram.com/p/DAaJNXyCfT_
चोरीचे दागिने गहाण ठेवून घेतले पैसे
त्यांनी गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांच्या आई वडिलांचे आहेत. त्यांना औषधोपचारासाठी पैशांची गरज आहे, असे सराफ व्यावसायिकांना सांगून त्यांच्याकडे सोन्याचे दागिने तारण ठेवून पैसे घेतले होते. या सराफ व्यावसायिकांकडून १९ तोळे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, चार मोबाईल असा १५ लाखांचा माल जप्त केला आहे.
https://www.instagram.com/p/DAYypv3ivep
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक महादेव शेलार, राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलीस अंमलदार दीपक साबळे, सचिन घाडगे, संदीप वारे, अक्षय नवले, जनार्दन शेळके, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, तुषार पंदारे, संजू जाधव, सागर धुमाळ, अजित भुजबळ, विजय कांचन, अजय घुले, ज्ञानदेव क्षीरसागर, राहुल घुबे, रामदास बाबर, तुषार भोईटे, मंगेश भगत, सागर नामदास, योगेश नागरगोजे, धीरज जाधव, निलेश सुपेकर, बाळासाहेब कारंडे,
आसिफ शेख, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, विनोद पवार, निलेश शिंदे, बाळासाहेब खडके,
समाधान नाईकनवरे, राहुल पवार, हनुमंत पासलकर, महेश बनकर, हेमंत विरोळे, विनोद भोकरे, प्रसन्ना घाडगे,
काशिनाथ राजापूरे, दगडू विरकर, सुजाता कदम, नंदा कदम, स्वाती पाटील, नारायणगाव पोलीस ठाण्याचे अंमलदार संतोष कोकणे,
सत्यम केळकर, सोमनाथ डोके, सुभाष थोरात, अमोल मिडगुले, निलेश जाधव, जितेंद्र पाटील, शुभांगी,
दरवडे, शीतल गारगाटे, सोनाली गडगे, निता शेळके, कविता गेंगजे यांनी केली आहे.
https://www.instagram.com/p/DAYw_cKCgbc
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण
Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्यास पोलिसांनी केली अटक
Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’