Pune Rural Police News | मंदिरात चोर्‍या करणारा चोरटा जेरबंद ! पुणे, नगर मधील 11 मंदिरातील चोरीचे गुन्ह्यातील 4 लाखांचा ऐवज हस्तगत

Pune Rural Police

पुणे : Pune Rural Police News | रात्रीच्या वेळी मंदिरात कोणी नसते, चोरायला सोपे असल्याने त्याने पुणे व नगर जिल्ह्यातील अनेक मंदिरात शिरुन चोर्‍या करण्याचा सपाटा लावला होता (Theft In Temple). शेवटी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या पारगाव (कारखाना) पोलिसांना (Pargaon Karkhana Police Station) या चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले.

विनायक दामू जिते (रा. कान्हूर मेसाई ता. शिरुर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून आंबेगाव, शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, खेड तसेच नगर जिल्ह्यातील सुपे अशा एकूण ११ मंदिरातील चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आली असून ४ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख (IPS Pankaj Deshmukh) यांनी माहिती दिली. पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मंदिरातील चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी ग्रामीण पोलीस दलास हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, हवालदार अमोल वडेकर, पोलीस अंमलदार संजय साळवे व मंगेश अभंग हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना वेगवेगळ्या मंदिरात जाऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करीत होते. त्यात एक संशयित चोरी करताना आढळून आला. तो विनायक जिते हा सराईत गुन्हेगार असल्याची ओळख पटली. तो शिक्रापूरला येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

चौकशीत त्याने मंदिर चोरीची कबुली दिली. त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, लाखणगाव येथील देवीचे मंदिर, मांडळेवाडी येथील हनुमान मंदिर, जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदिर, असे पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे सांगितले. आणखी विचारपूस केल्यावर शिक्रापूर येथील राऊतवाडी येथील श्रीनाथ मस्कोबा मंदिर, तसेच कवटेमळा येथील वडजाई माता मंदिर, खेड, राजगुरुनगर येथील कन्हेरसर येमाई जुने ठाणे मंदिर, शिरुर सविंदणे येथील काळुबाई मंदिर, रांजणगाव फडवस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर, घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदिर व कळंमजाई मंदिर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील सुपा येथील तुकाई मंदिर, वाडे गव्हाण पारनेर व नगर एमआयडीसी येथील श्री खंडोबा मंदिर शिवमल्हार गड पिंपळगाव माळी या ठिकाणी रात्रीच्या वेळी मंदिरांमध्ये चोर्‍या केल्याचे सांगितले.

त्याच्याकडून वेगवेगळ्या मंदिरात चोरलेल्या सोन्याचे मणी, वाट्या, अ‍ॅम्पली फायर, देवीचा मुखवटा, चांदीचा देवीचा मुखवटा, अ‍ॅम्प्ली फायर, मंगळसुत्र, सोन्याची नथ, पितळी घंटा, चांदीचा नंदी, चांदीचे दोन घोडे असे १ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, १ लाख १७ हजार रुपयांचे चांदीचे मुखवटे, पितळी धातूच्या वस्तू, ८० हजार रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य व ३२ हजार रुपये रोकड असा माल हस्तगत केला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,
खेड उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे,
हवालदार अमोल वडेकर, अविनाश कालेकर, दत्तात्रय जढर, देवानंद किर्वे, अजित मडके,
पोलीस अंमलदार शांताराम सांगडे, रमेश उचके, संजय साळवे, मंगेश अंभग, चंद्रकांत गव्हाणे, नवनाथ राक्षे,
गजानन डाके, ओमनाथ तुमकुटे, राजेश उतळे व हवालदार विक्रम तापकीर, पोलीस अंमलदार निलेश सुपेकर,
मंगेश भिगळे, पोलीस मित्र रामभाऊ वाळुंज, लाखणगाव पोलीस पाटील कल्पना बोहाडे यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

You may have missed