Pune Satara Highway Toll | पुणे- सातारा महामार्गावर टोल वसुलीसाठी मुदतवाढ नाही; मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

Toll

मुंबई : Pune Satara Highway Toll | पुणे- सातारा महामार्गावर टोल वसुलीसाठी मुदतवाढ देण्यात आली नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (PWD Minister) रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली आहे. विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली.

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ” पुणे-सातारा रस्त्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (Reliance Infrastructure) यांना सन २०१० मध्ये बीओटी तत्वावर देण्यात आले असून या कंपनीला गेल्या दहा वर्षात सहा वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याची बाब खरी आहे. सद्यःस्थितीत पुणे-सातारा महामार्गाचे करारनाम्यातील एकूण १४०.३५ किलोमीटर लांबीपैकी १३७.७१ कि.मी. लांबीतील काम पूर्ण झाले असून उर्वरित २.६४ कि.मी. लांबीतील कामामधील विविध अडचणींमुळे काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे.

सद्यःस्थितीत पुणे-सातारा महामार्गाचे बहुतांशी काम ३० एप्रिल २०२२ रोजी पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२३ अखेर कंपनीकडून ३११४.०२ कोटी रुपये टोल वसूल करण्यात आला आहे. एनएचएआय आणि उद्योजक यांच्यात झालेल्या १० मार्च २०१० रोजीच्या करारानुसार टोल नाके निश्चित करून ५ डिसेंबर २००८ आणि २६ ऑगस्ट २०१० रोजीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिसूचनेनुसार टोल आकारणी केली जात आहे.

मूळ करारानुसार १४०.३४ किमी लांबीच्या सहापदरीकरणाच्या कामाच्या प्रकल्पाची किंमत १७२४.५५ रुपये होती. सवलत करारानुसार सवलत कालावधी २४ वर्षे असून ऑक्टोंबर २०१० मध्ये कार्यादेश देण्यात आला होता.

मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (पुणे-सातारा) टोल वसुली राष्ट्रीय महामार्ग अधिसूचना
५ डिसेंबर २००८ आणि २६ ऑगस्ट २०१० नुसार करण्यात येते.
१ एप्रिल २०२३ पासून यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्ग, पुणे-मुंबई जुना महामार्ग यांच्या टोलमध्ये १ एप्रिल २०२३ पासून वाढ करण्यात आली आहे.

या पथकरातील वाढ महाराष्ट्र शासनाच्या ऑगस्ट २००४ आणि केंद्र शासन अधिसूचना
सप्टेंबर २००६ अन्वये निश्चित करण्यात येते.
पथकर वसुली शासनाच्या नियमाप्रमाणे असल्याने पथकरात केलेली वाढ मागे घेण्याचा प्रश्न नाही,
असेही सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी उत्तरात सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Atal Pension Yojana | ज्येष्ठांना 5000 नव्हे 10000 रुपये पेन्शन देणार सरकार, अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पात करतील घोषणा?

Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?

Ajit Pawar NCP Sabha In Baramati | लोकसभा निवडणुकीत लोकसभा पराभव झालेल्या बारामतीत अजित पवार गटाची भव्य सभा होणार