Pune Swargate Crime News | भरदिवसात गर्दीने भरलेल्या बसमध्ये तरुणीशी अश्लिल कृत्य; मैत्रिणींनी खडसावले, स्वारगेटजवळील प्रकार

molest

पुणे : Pune Swargate Crime News | शंकरशेट रोडवरील कुमार पॅसिफिक मॉलसमोरील (Kumar Pacific Mall Satara Road) बसस्टॅडवरुन प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये बसलेल्या तरुणींच्या अंगावरुन हात फिरवून तिचा विनयभंग (Molestation Case) करुन अश्लिल वक्तव्य करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण, बसमध्ये इतके प्रवासी असतानाही कोणी पुरुष त्याला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. शेवटी या तरुणीच्या तीन मैत्रिणींनी त्याला विरोध केल्यावर तो पळून गेला.

याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तुषार सुधीर खाटमोडे Tushar Sudhir Khatmode (वय ३४, रा. नारायण पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिच्या मैत्रिणी शंकरशेट रोडवरील कुमार पॅसिफिक मॉल येथील बसस्टँडवरुन बसमध्ये बसल्या. यावेळी तुषार याने फिर्यादीच्या अंगावरुन हात फिरवून तिचा विनयभंग केला. तेव्हा तिने विरोध केला. पण बसमधील कोणीही पुरुष त्याला अडवायला पुढे झाला नाही. तेव्हा तिच्या तीन मैत्रिणीने त्याला विरोध केला. त्यांच्यातील एका तरुणीने तुषारचे आयकार्ड हिसकावून घेतले. एका वेळी चार तरुणी त्याला प्रतिकार करु लागल्याचे पाहून तो पळून गेला. या तरुणींनी त्याच्या आयकार्डवरील नंबरवरुन मोबाईल केला तेव्हा त्याने या तरुणीशी अश्लिल बोलून तु माझी तक्रार केल्यास तुला सोडणार नाही, असे बोलून लज्जास्पद वर्तन केले. पोलिसांनी तुषार खाटमोडे याच्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक आकाश विटे (PSI Akash Vite) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Uday Joshi Arrest | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक;
निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती 1 कोटी 79 लाख रुपयांची फसवणूक

Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडीला धक्का लागल्याने नुकसान भरपाईसाठी केले अपहरण;
फोन पे द्वारे घेतले 10 हजार रुपये

Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणींना डिसेंबर- जानेवारी महिन्याचे 3000 रुपये एकत्रित मिळणार;
पैसे खात्यात कधी जमा होणार? जाणून घ्या

You may have missed