Pune Traffic Police | एका महिन्यात ‘पीटीपी’ अ‍ॅप 62 हजार नागरिकांनी डाऊनलोड करुन स्वत:वरील 5 कोटी 39 लाखांचा दंडाचा केला भरणा

Pune Traffic Police | 62 thousand citizens downloaded the 'PTP' app in a month and paid a fine of Rs 5 crore 39 lakhs on themselves

सर्वाधिक नियमभंगाच्या केसेस करणार्‍यांचा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते गौरव

पुणे : Pune Traffic Police | वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमभंग करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी पीटीपी अ‍ॅपचा वापर करुन केला आहे. एका महिन्यात ६२ हजार ३१८ नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करुन घेताना तब्बल ५ कोटी ३९ लाख ४४ हजार २५० रुपयांचा वाहतूक नियमभंगाचा दंडाचा भरणा केला आहे. आतापर्यंत १ लाख ५५ हजार नागरिकांनी या अ‍ॅपचा वापर केला असून नियमभंगाचे २ लाख ४९ हजार ८०० फोटो पाठविले. त्याची पडताळणी करुन वाहतूक पोलिसांनी तब्बल १ लाख ७६ हजार ८८७ केसेसचे चलन करण्यात आले आहे.

नागरिकांनी पीटीपी अ‍ॅपचा वापर करुन शहरातील अनाधिकृत होडिंग बाबत माहिती पोलिसांना द्यावी. त्याचप्रमाणे रस्त्यावरील बेवारस, बिनधनी वाहने, रस्त्यावर विनाकारण पार्क करुन वाहतूकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, रस्त्यावरुन हटवुन रस्ता नागरिकांसाठी खुला करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी अशा वाहनांची माहिती पीटीपी अ‍ॅपद्वारे कळवावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी यावेळी केले.
पीटीपी अ‍ॅपद्वारे सर्वाधिक वाहतूक कारवाई नोंदविणार्‍या विजेत्यांचा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.

या अ‍ॅपद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकाविरोधात तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पीपीसीआर व पुणे शहर वाहतूक शाखा यांच्या विद्यमाने सर्वाधिक कारवाई करणार्‍या प्रथम पारितोषिक ५० हजार व प्रमाणपत्र तर, द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पंचम पारितोषिक अनुक्रमे २५ हजार, १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये अशी बक्षीसे देण्यात आली. पीटीपी अ‍ॅपद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींवर प्रभावीपणे कारवाई करणार्‍या ३ पोलीस अंमलदारांनाही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.


पीटीपी अ‍ॅपचा वापर करण्यापूर्वी तुमच्यावर कोणताही वाहतूक नियमभंगाचा दंड प्रलंबित नसावा, अशी अट आहे. त्यामुळे अ‍ॅप वापरकर्ता यांनी अ‍ॅप वापरण्यापूर्वी स्वत:वर असलेला एकूण ९ कोटी ३२ लाख ८२ हजार ५० रुपयांचा भरणा केलेला आहे. जानेवारी महिन्याअखेर ९३ हजार १९० नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊन लोड करुन घेतले होते. त्यापूर्वी त्यांनी स्वत:वर असलेला ३ कोटी ९३ लाख ३७ हजार ९०० रुपयांचा दंड भरणा केला होता.
या कार्यक्रमास सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव उपस्थित होते.

You may have missed