Pune Traffic Police Action | तीन दिवसात दारु पिऊन वाहन चालविणारे 176 चालकांवर पोलिसांची कारवाई
पुणे : Pune Traffic Police Action | दारु पिऊन भरधाव वाहन चालविणार्यांमुळे अपघात होऊन त्यात कोणतीही चुक नसलेल्यांचा जीव जातो तर, काही कायमचे जायबंदी होतात. अशावर अंकुश ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ३ दिवस विशेष मोहिम राबविली त्यात मद्य पिऊन वाहन चालविणार्या १७६ वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
वाहतूक पोलिसांनी ५ ते ७ डिसेंबर दरम्यान ३ दिवस शहरातील विविध भागांमध्ये एकूण २० ठिकाणी नाकाबंदी पॉईंट उभारुन तपासणी करण्यात आली.
या विशेष कारवाईदरम्यान मद्य पिऊन वाहन चालविणार्या १७६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. संबंधित वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक दंड व पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे.
मद्य प्राशन करुन वाहन चालवणे, हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करुन स्वत:चा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले आहे.
