Pune Traffic Police | गुगल मॅप पुण्यातील चौकामधील सिग्नलचे टायमिंग ठरविणार! Traffcure सॉफ्टवेअरच्या सहाय्याने वाहतूक कोंडीवर करणार प्रभावी उपाय योजना

Pune Traffic Police | Google Maps will determine the timing of signals at intersections in Pune! Effective solutions to traffic congestion will be implemented with the help of Traffcure software

पुणे : Pune Traffic Police |  पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी गुगल मॅपच्या सहाय्याने traffcure (टॅफिक्युअर) हे अत्याधुनिक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. त्यामुळे पुणे शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam)  व मंदगती  (Slow Down)  याबाबत प्रत्यक्ष वेळेत (Real Time ) माहिती प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर गुगल मॅपच्या साह्याने वाहनांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी चौका चौकातील सिग्नलचे टायमिंग ठरविले जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

गुगल मॅप, लेफ्टन इंडिया आणि पुणे शहर वाहतूक विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याचे सादरीकरण सोमवारी पोलीस आयुक्तालयात करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.

या सॉफ्टवेअरमधील स्वतंत्र अलर्ट प्रणालीमुळे वाहतूक कोंडी झालेल्या संबंधित ठिकाणी वाहतूक  पोलीस तात्काळ पोहोचून वाहतूक कोंडी निवारणाची कारवाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यासोबतच शहरातील बहुतांश रस्त्यांवरील वाहनांचा सरासरी वेग मोजणे तसेच वाहतूक अडथळ्यांची कारणे संकलित करणे, या प्रणालीद्वारे शक्य होणार आहे.

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यावरील ५५० पेक्षा जास्त विभाग बनविण्यात आले असून त्या विभागाप्रमाणे वाहतूक परिस्थितीचे निरीक्षण करता येणे शक्य झाले आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०२६ या ४५ दिवसांचे कालावधीत करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार रस्त्यावरील वाहनांचा सरासरी वेग हा २६.८ किमी/तास असा नोंदविण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरमुळे रस्त्यावरील वाहनांचा वेग वाढविता येणे शक्य होणार आहे.

अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, एखाद्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली तर त्या टप्प्यामध्ये यापूर्वी त्याच कालावधीत, त्याच मागील वारी कधी, किती वेळ वाहतूक कोंडी झाली होती, याची माहितीही वाहतूक पोलिसांना मिळणार आहे. नवले पुल ते वडगाव पुल या दरम्यान सोमवारी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान वाहतूक कोंडी झाली असेल तर त्या ठिकाणी मागील १० सोमवारी कधी कधी कोंडी, किती वेळ झाली होती़ त्याची माहिती मिळणार आहे. त्यातून वाहतूक पोलिसांना प्रभावी उपाय योजना करण्यास मदत मिळणार आहे. सॉफ्टवेअरच्या वापरामुळे वाहनचालकांना कमीत कमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल, परिणामी नागरिकांचा प्रवासातील वेळ वाचून वाहतूक अधिक गतिमान व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

यावेळी सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त हिमंत जाधव, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी उपस्थित होते.

You may have missed