Pune Traffic Police – ITMS | वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास 5 मिनिटात दंडाची पावती थेट मोबाईलवर; पुणे पोलीस घेणार एआयची मदत
पुणे : Pune Traffic Police – ITMS | वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Rule Violation) करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आता इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (Intelligent Traffic Management System – ITMS) या प्रणालीचा वापर करणार आहेत. एआय तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे. चौकामध्ये एखाद्या वाहनाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर अवघ्या पाच मिनिटात दंडाची पावती त्या वाहन चालकाच्या मोबाईलवर फोटोसह जाणार आहे. त्यासाठी पोलीस ऑटोमॅटीक नंबर प्लेट रिकग्नेशन कॅमेराची मदत घेणार आहेत. जो स्वयंचलित नंबरप्लेट ओळखणारा कॅमेरा असेल.
याबाबत पोलिसांनी प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. लवकरच सल्लागारांची नेमणूक करण्यात येणार असून कामाला सुरुवातही होणार आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सद्यस्थितीला शहरात स्मार्टसिटीचे ४३० आणि गुन्हे संदर्भातील १ हजार ३४१ कॅमेरे कार्यरत आहेत.
देशात सर्वाधिक वाहनांची संख्या असणाऱ्या शहरात पुण्याचा क्रमांक लागतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहतूक विभागाकडील अपुरे मनुष्यबळ, वाहतूक नियमन यासह विविध कामांमुळे अशा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिसांना मर्यादा येतात.
दुसरीकडे नियंत्रण कक्षातून कॅमेऱ्यांद्वारे कारवाई करताना एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष ठेवता येत नाही. त्यामुळे पोलिस सिग्नलवरील कॅमेऱ्यांचा प्रभावी वापर करून ही स्मार्ट यंत्रणा लागू करण्याच्या विचाराधीन आहेत.
सध्याच्या परिस्थितीत नियंत्रण कक्षात बसलेले पोलिस कॅमेऱ्यांवरून चौक निवडतात. त्याद्वारे चौकात सिग्नल तोडणारे, ट्रिपलसीट येणारे दुचाकीस्वार, झेब्रा क्रॉसिंगवर थांबलेली वाहने यांच्या फोटोचे स्क्रीन शॉट घेतात. त्यामध्ये संबंधित वाहनांचा नंबर असतो.
पुढे ही माहिती त्या-त्या वाहतूक विभागाला वाहनांच्या फोटोसह दिली जाते.
त्यानंतर तेथून त्या वाहनचालकाच्या मोबाइलवर दंडाची पावती फोटोसह पाठवली जाते.
मात्र, आता या प्रणालीच्या माध्यमातून नियमभंग होताच काही मिनिटांत दंडाची पावती वाहनचालकाच्या मोबाइलवर येणार आहे.
इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रणालीच्या माध्यमातून चौकात,
रस्त्यांवर लावण्यात आलेले कॅमेरे प्रादेशिक परिवहन विभागाच्या ‘सारथी’ आणि ‘वाहन’ या संकेतस्थळाला जोडले जाणार आहेत.
हे सर्व कॅमेरे हायटेक असणार आहेत. वाहन चालकांनी नियम मोडताच हे कॅमेरे स्वतः वाहन चालकांचा फोटो काढतील.
कॅमेरा सारथी आणि वाहन या यंत्रणेला कनेक्ट असल्याने
नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना मेसेज करून दंडाची रक्कम मोबाइल क्रमांकावर पाठवणार आहे.
यात ओव्हर स्पीड, सिग्नल न पाळणे यांसारख्या नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा