Pune Traffic Police News | पुण्यात 12 ऑगस्ट पर्यंत ‘या’ वाहनांना बंदी; प्रमुख 30 ठिकाणी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत नियम लागू
पुणे: Pune Traffic Police News | आज सोमवार (दि.५) ते (दि. १२) ऑगस्ट यादरम्यान शहरातील प्रमुख ३० वाहतूक चौकात अवजड वाहनांवर बंदी लागू केली आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी रविवारी एक अधिसूचना जाहीर करून शहरातील प्रमुख ३० ठिकाणी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत अवजड वाहनांवर बंदी लागू केली आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपयोग होणार आहे. (Pune Traffic Updates)
या बंदीचा निर्णय सततच्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशामुळे घेण्यात आला आहे. रस्त्यावरील खड्डे आणि दुरुस्ती यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. हा बंदीचा नियम अवजड वाहनांसाठी असला तरी आपत्कालीन सेवांमध्ये सहभागी वाहनांना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
वाहतूक विभागाचे डीसीपी रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेत हे स्पष्ट केले आहे. या बंदीचा नियम ट्रक, डंपर, कॉंक्रिट मिक्सर आणि इतर अवजड वाहनांवर लागू होईल.
बंदी असलेली ठिकाणे खालीलप्रमाणे,
संचेती चौक, पौड फाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलायम पूल, सावरकर पुतळा चौक, लक्ष्मी नारायण सिनेमा चौक, सेव्हन लव्हज चौक, पंडोल अपार्टमेंट चौक, खणे मारुती चौक, पावर हाऊस चौक, आरटीओ चौक, पाटील इस्टेट चौक, ब्रेमन चौक, शास्त्री नगर, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, मुंढवा चौक, नोबेल चौक, लुल्लानगर ते गोळीबार मैदान, लुल्ला नगर ते गंगाधाम, पुष्पा मंगल चौक, राजास सोसायटी, पोल्ट्री चौक, उंड्री, पिसोळी, हांडेवाडी, अभिमनाश्रे बाणेर आणि अभिमनाश्री पाषाण.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?