Pune Traffic Police | पुणे: महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्त अहिल्यानगर रस्ता परिसरात जड वाहनांना बंदी; 18 ते 22 मार्च दरम्यान दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत असणार बंदी

Pune Traffic Police | Pune: Heavy vehicles banned from Ahilyanagar Road area on the occasion of Maharashtra Kesari Competition; Ban will be in place from 2 pm to 11 pm from March 18 to 22

पुणे : Pune Traffic Police | महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्त पुणे- अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर १८ ते २२ मार्च दरम्यान दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पीएमपी बस, एस टी बससेवा सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेनिमित्त राज्यभरातून कुस्ती शौकीन लोणीकंद परिसरात येणार आहेत. या स्पर्धेसाठी होणारी गर्दी, तसेच रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणार्‍या वाहनांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १८ ते २२ मार्च दरम्यान दुपारी दोन ते रात्री अकरापर्यंत लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्ग (बायपास) परिसरात माल वाहतूक करणारे ट्रक, प्रवासी वाहतूक करणार्‍या आराम बस, बल्कर मंदगती वाहने (जेसीबी, रोड रोलर, ट्रॅक्टर) अशा वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्ग, तसेच उपरस्त्यांवर जड वाहनांची वाहतूक, तसेच रस्त्याच्या कडेला जड वाहने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. जड वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा,  असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

You may have missed