Pune Traffic Police | पुणे: दिवाळी खरेदीसाठी होणार्या गर्दीमुळे चारचाकीसाठी शिवाजी रोड बंद ! 5 नोव्हेंबरपर्यंत वाहतूकीमध्ये बदल

पुणे : Pune Traffic Police | दिवाळीच्या (Diwali 2024) खरेदीसाठी मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. खरेदीकरीता येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यातच पार्क करीत असल्याने मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी चार चाकी वाहनांना शिवाजी रोडने जाण्यास मनाई केली आहे. हा बदल ५ नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे, असा आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांनी काढला आहे. (Shivaji Road Pune)
शिवाजीनगरवरुन शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स़ गो़ बर्वे चौकामधून वळविण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – जंगली महाराज रोडने, टिळक चौकातून इच्छितस्थळी जातील.
स्वारगेटवरुन बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौकमार्गे जाणारी चारचाकी वाहने पुरम चौकामधून डावीकडे वळून टिळक रोडने एस पी कॉलेज, अलका चौकमार्गे इच्छितस्थळी जातील.
अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग – बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.
फुटका बरुज वरुन जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग – शिवाजी रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.
शनिपार चौकाकडून मंडईकडे जाणारी वाहतूक व कुमठेकर रोडवरुन मंडईकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.
पार्किंगबाबत
बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व मंडई या भागामध्ये खरेदीकरीता येणार्या नागरिकांनी त्यांची वाहने बाबु गेनू पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ या ठिकाणी पार्क करावीत. (Pune Traffic Police)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे फडणवीसांची भेट? अमित शहांना राऊतांचा फोन?
या चर्चेवर काँग्रेसचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘आमच्यात भांडणं लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न’
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण