Pune Traffic Updates | गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी करण्यात येत असून ते काम सुरु झाल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली
पुणे : Pune Traffic Updates | गंगाधाम चौक ते आईमाता मंदिर रस्त्यावर होणारे अपघात कमी व्हावेत, यासाठी या मार्गावरील तीव्र उतार कमी करण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी मार्ग बंद ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आवश्यकेनुसार बदल करणे गरजेचे आहे. यामुळे या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
मार्ग : कान्हा हॉटेल ते गंगाधाम चौक
पर्यायी मार्ग : कान्हा हॉटेल -पासलकर चौक/व्हीआयटी होस्टेल चौक -बिबवेवाडी रोडवरुन इच्छित स्थळी जावे.
मार्ग : गंगाधाम चौक ते कान्हा हॉटेल
पर्यायी मार्ग : १) गंगाधाम चौक – चंद्रलोक चौक – बिबवेवाडी रोडवरुन इच्छित स्थळी जावे.
१) गंगाधाम चौक – लुल्लानगर चौक – कोंढवा मार्गे इच्छित स्थळी जावे.
या कामानिमित्त हा बदल पुढील आदेशापर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. वाहनचालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
