Pune Traffic Updates | विधानसभा मतमोजणीमुळे कोरेगाव पार्क परिसरात वाहतूक निर्बंध; जाणून घ्या कोणते रस्ते बंद, तगडा पोलीस बंदोबस्त

Pune Traffic Police

पुणे : Pune Traffic Updates | पुणे शहरातील ८ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी (Assembly Election Counting) कोरेगाव पार्क (Koregaon Park Pune) येथील एफ सी आय गोदामात शनिवारी होणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. या ठिकाणी मुख्य स्ट्रॉग रुम, एफ सी आय गोडावून, अतिरिक्त झोन पेट्रोलिंग वाहतूक नियंत्रण बंदोबस्त, उमेदवारांचे निवासस्थान व पक्ष कार्यालय बंदोबस्त, संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणांचा बंदोबस्त, नियंत्रण कक्ष, राखीव आर सी पी क्यु आर टी, आपत्कालीन बंदोबस्त, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसांबत पेट्रोलिंग फोर्स व राखीव प्रमाणे बंदोबस्त लावण्यात आला आहे. विधानसभा निवडणुक मतमोजणी बंदोबस्ता करीता एकूण ४ अपर पोलीस आयुक्त, ११ पोलीस उपायुक्त, १९ सहायक पोलीस आयुक्त, ३५० पोलीस अधिकारी, २ हजार ५०० पोलीस अंमलदार, केंद्रीय सशस्त्र पोलीस बला च्या १२ कंपन्या आणि राज्य राखीव दलाच्या २ कंपन्या असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. (Pune Police Bandobast)

कोरेगाव पार्क येथील एफ सी आय गोडावून येथील २०० मीटर परिसरात परवानगीशिवाय इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास, हत्यार बाळगण्यास, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

वाहतूक नियोजन

कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रासमोरील साऊथ मेन रोडवर पूर्वेस लेन नं. ५ -जंक्शन, पश्चिमेस लेन नं. २ जंक्शनपर्यंत तसेच लेन नं. ३ व लेन नं. ४ वर २०० मीटर पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग झोन करण्यात येत आहे.

डॉन बॉक्सो युवा केंद्रापासून पुणे साऊथ मेन रोड येथे शुक्रवारी रात्री दहा वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.

सेंट मीरा कॉलेज व अतुर पार्क सोसायटीकडून साऊथ मेन रोडकडे येणार्‍या वाहनांना लेन नं. १ पुणे प्रवेश बंद करण्यात येत आहे. लेन नं. ५, ६, व ७ कडून साऊथ मेन रोड व येणार्‍या वाहनांना लेन नं. ४ पुढे प्रवेश बंद राहिल. या वाहनांनी उजवीकडे वळण घेऊन इच्छित स्थळी जावे.

लेन नं. २ वर प्लॉट नं. ३८ जैन प्रॉपर्टी येथे व लेन नं. ३ वर बंगला नं. ६७ व ६८ वर साऊथ मेन रोडवर येणार्‍या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. हे निर्बध मतमोजणी पूर्ण होईपर्यंत असणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Punit Balan Studios – Raanti Movie | पुनीत बालन स्टुडिओज निर्मित अ‍ॅक्शनपॅक्ड ‘रानटी’ आज चित्रपटगृहात

Punit Balan Studios-Raanti Movie | चित्रपटगृहात ‘रानटी’चा धुमाकूळ ! सर्वच चित्रपटगृहांत प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल  प्रतिसाद