Pune Vidhan Sabha Election 2024 | काँग्रेसकडून पुण्यातील ८ मतदारसंघातील इच्छुकांची नावे जाहीर; हायकमांड करणार उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Pune Vidhan Sabha Election 2024) दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी रणनीती आखत मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. दरम्यान मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची यादी पक्ष श्रेष्ठींकडे पाठवली जात आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसकडून (Pune Congress Candidates) उमेदवारी मागितलेल्या दोन आमदारांसह २१ इच्छुकांची नावे पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीकडून (Pune District Congress Committee) जाहीर करण्यात आली आहे. यात ‘पुरंदर’ मधून आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) आणि ‘भोर’ मधून संग्राम थोपटे (Sangram Thopte) या दोघांनीच उमेदवारी मागितली आहे. (Pune Vidhan Sabha Election 2024)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागविले होते. जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आलेले हे अर्ज प्रदेश काँग्रेसकडे पाठवले आहेत. प्रदेश काँग्रेसकडून या अर्जांची छाननी केल्यानंतर ते अर्ज राष्ट्रीय काँग्रेसकडे पाठवण्यात येतील. त्यानंतर उमेदवारीचा निर्णय राष्ट्रीय काँग्रेसकडून जाहीर करण्यात येईल.
जुन्नरमधून सत्यशील सोपानशेठ शेरकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जुन्नर मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे (NCP Sharad Pawar) जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेरकर आणि माजी आमदार शरद सोनावणे यांना ‘राष्ट्रवादी’कडून उमेदवारी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जुन्नरप्रमाणेच आंबेगाव, शिरूर, मावळ आणि खडकवासलातून काँग्रेसकडे इच्छुक उमेदवार असले,
तरी हे मतदारसंघ ‘राष्ट्रवादी’कडे राहतील, अशीच शक्यता आहे.
मावळमधून काँग्रेसकडून नऊ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. जिल्ह्यातील इतर कुठल्याही मतदारसंघांत इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारी मागितली गेली नाही.
इंदापूर आणि दौंड मतदारसंघांतून काँग्रेसकडे कोणीही उमेदवारी मागितलेली नाही. या दोन्ही मतदारसंघांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे प्राबल्य असल्याने या ठिकाणाहून काँग्रेसकडे कोणीही उमेदवारी मागितलेली नाही. इंदापूर येथील काँग्रेसचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर येथील काँग्रेसचे प्राबल्य संपुष्टात आले आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद