Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे: Pune Water Supply | गुरुवारी (दि.२२) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी देखील शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्रांसह अन्य जलकेंद्रातील टाक्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरुन पाण्याच्या योग्य साठा करावा, असे आवाहन पुणे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे. (Pune Water Supply)
पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार, जॅकवेल, पर्वती टँकर पॉइंट, लष्कर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, नवे व जुने होळकर जलकेंद्राचे देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या टाक्यांवर अवलंबून असलेल्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील. त्याचबरोबर वारजे जलकेंद्र आणि चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकीतून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या भागातीलही पाणीपुरवठा बंद राहील.
एसएनडीटी एमएलआर व एचएलआर परिसर, चतुश्रृंगी टाक्यांची देखील साफसफाई केली जाईल. परिणामी त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीसाठा बंद राहील. नागरिकांनी याची नोंद घेणे गरजेचे आहे.
बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्यामुळे नागरिकांनी आधीच सतर्क होऊन
पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर संबंधित टाक्यांचे देखभाल दुरुस्तीचे
काम सुरु राहील. त्यामुळे शुक्रवारी सकाळी अनेक भागात कमी दाबाचे पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा