Pune Yerawada-Shastrinagar Chowk | पुणे : येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात वाहतूकीत बदल ! रात्री दहा ते सकाळी ७ होणार बदल, उड्डाणपुलासाठी होणार माती परिक्षण
पुणे : Pune Yerawada-Shastrinagar Chowk | येरवड्यातील शास्त्रीनगर चौक येथे ग्रेडसेपरेटर व उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी माती परिक्षणासाठी ६ ठिकाणी बोअर होल घेण्यात येणार आहे. त्यासाठी या परिसरातील वाहतूकीत १२ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान बदल करण्यात येणार आहे. हा बदल रात्री दहा ते सकाळी सात दरम्यान बदल असणार आहेत.
- शास्त्रीनगर चौक ते गोल्फ क्लब चौक मार्गावरील सर्व प्रकारची जड अवजड वाहतूक बंद करण्यात येत असून ही वाहने शास्त्रीनगर चौक, गुंजन चौक, पर्णकुटी चौक, महात्मा गांधी उद्यान चौक, तारकेश्वर चौक, डावीकडे वळण घेऊन सादलबाबा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
- शास्त्रीनगर चौक ते गोल्फ क्लब चौकाकडे जाणारी चारचाकी वाहने आवश्यकतेनुसार शास्त्रीनगर चौक सरळ गुंजन चौक उजवीकडे वळण घेऊन गोल्फ क्लब चौक मार्गे वळविण्यात येईल.
- शास्त्रीनगर चौकातून गोल्फ क्लब चौकाकडे जाणारी बाजुस (लुप रोड डावी बाजु)
शास्त्रीनगर चौकापासून २०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग व नो होल्टिंग झोन करण्यात येत आहे.
नागरिकांनी या कालावधीत दिलेल्या मार्गाचा वापर करावा तसेच वाहतूक कर्मचारी/ स्वयंसेवक यांना सहकार्य करावे़
असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे (Amol Zende DCP) यांनी केले आहे. (Pune Yerawada-Shastrinagar Chowk)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन