Pune Youth Missing In US | पुण्यातील तरुण सहा दिवसांपासून अमेरिकेत बेपत्ता; आई-वडिलांची पंतप्रधान मोदींना विनंती
पुणे : Pune Youth Missing In US | पुण्यातील सिद्धांत पाटील (Siddhant Patil) हा तरुण मागील सहा दिवसांपासून अमेरिकेत बेपत्ता झाला आहे. अमेरिकेमधील नदीत चेहरा धूत असताना पाय घसरून तो नदीत पडला होता अशी माहिती सिद्धांतसोबत असलेल्या मित्रांनी सिद्धांतच्या वडिलांना दिली आहे. या घटनेमुळे सिद्धांतच्या कुटुंबात घालमेल सुरु आहे. मुलाचा शोध घ्या असे पत्र जेष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jayshankar) यांनी लिहिले आहे.
मुळचा जळगावचा असलेल्या सिद्धांतचे कुटुंब पुण्यातल्या पिंपळे निलखमध्ये (Pimple Nilakh) स्थायिक झाले आहे. सिद्धांत त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक. तो २०२१ साली अमेरिकेत पुढील शिक्षणासाठी गेला. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै ला ( शनिवारी ) तो त्याच्या मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला. ट्रेकिंग दरम्यान पाय घसरून तो नदीत पडला. सहा दिवस उलटले तरीही याबाबत काहीही माहिती मिळाली नाही. (Pune Youth Missing In US)
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील केंद्र सरकारला याबाबत पत्र लिहिलं आहे.
सिद्धांतचा शोध घेण्यात अमेरिकन प्रशासन दिरंगाई करत आहे, असा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला आहे.
सिद्धांतचे वडील विठ्ठल पाटील यांनी या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना साकडं घातलं आहे.
पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर माझ्या मुलाचा शोध घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड