Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू, कुटुंबातील सदस्य ! बाप्पाला निरोप देताना पुनीत बालन भावूक (Video)

Punit Balan

ऑनलाइन टीम – Punit Balan – Bhau Rangari Ganpati | बाप्पा माझे गुरू आहेत. दहा दिवसांनंतर त्यांना निरोप देताना भावना दाटून आल्या आहेत. ज्या शब्दांत सांगणे कठीण आहे. अशी भावना हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati) ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी व्यक्त केली.

https://www.instagram.com/p/C_-82UdJpo4

‘पोलीसनामा’शी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, बाप्पा माझे गुरू आहेत. त्यांना निरोप देताना, विसर्जन करताना असं वाटत आहे की, घरातील एक सदस्य कुठे गेला आहे. त्यातून बाहेर यायला पुढील दहा के पंधरा दिवस लागतील. परंतू या गणेशोत्सवाच्या आठवणी मनात साठवून पुढच्या गणेशोत्सवाची अतुरतेने वाट पाहू.”

https://www.instagram.com/p/C_5jiXUJHYn

हा तर नवसाचा बाप्पा

पुनीत बालन यांनी सांगितले की, दहा दिवस गणेशोत्सवात जे भाविक येतात ते माझ्यासाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी नाही तर, नवसाचा बाप्पा आहे म्हणून येतात. त्यांच्यासाठी हे श्रध्दास्थान आहे. त्यामुळे त्यांना व्यवस्थित दर्शन मिळावे, समाधान मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. त्यांची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देत असतो. या काळात सगळेच कार्यकर्ते भक्तांशी आपुलकीने आणि मृदूपणे बोलत असतात. हिच सेवा आहे. (Punit Balan – Bhau Rangari Ganpati)

https://www.instagram.com/p/DAAYeqjpgss

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात

Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”

Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली