Punit Balan Group (PBG) | गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व्यावसायासाठी पुनीत बालन ग्रुपकडून 3 कोटींच्या निधीची घोषणा; कार्यकर्त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांचा निर्णय

Punit Balan

पुणे : Punit Balan Group (PBG) | गणेश मंडळांचे (Ganesh Mandals In Pune) आधारस्तंभ असलेले युवा उद्योजक पुनीत बालन (Young Entrepreneur Punit Balan) यांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीही आता पुढाकार घेतला आहे. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना व्यावसायासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी ३ कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा ग्रूपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केली आहे.

पुण्यातील सार्वजनिक गणपती मंडळाचे कार्यकर्ते आणि ढोल ताशा पथकातील (Dhol Tasha Pathak Pune) वादक यांच्यावतीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust) उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीतदादा बालन यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक गणपतीची आरती त्यांच्या हस्ते झाली (Sarasbaug Ganpati). त्यानंतर अखिल मंडई मंडळाचे (Akhil Mandai Mandal) अध्यक्ष अण्णासाहेब थोरात (Annasaheb Thorat) आणि निंबाळकर तालीम मंडळाचे (Nimbalkar Talim Mandal) जेष्ठ कार्यकर्ते सुरेश पवार (Suresh Pawar) यांच्या शुभहस्ते कार्यकर्त्यांच्या वतीने पुनीतदादा बालन यांना मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना पुनीतदादा बालन म्हणाले, गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. ज्याला काही काम धंदा नाही तो गणपती मंडळाचे काम करतो अशी सर्व साधारण लोकांची धारणा असते, तसेच हा कार्यकर्ता महिना दीड महिना आपल्या नोकरी धंद्याची परवा न करता बाप्पाचं काम तन मन लावून करत असतो. गणेश मंडळाचा कणा म्हणजे कार्यकर्ता तो टिकला पाहिजे, तो जगला पाहिजे त्याला समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे आणि त्याच्याकडे आदराने पाहिलं पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून तीन कोटी रुपये आर्थिक मदत केली जाईल अशी घोषणा पुनीत दादा बालन यांनी केली. या निधीतून दरवर्षी 100 ते 300 कार्यकर्त्यांना मदत करण्यात येईल. प्रत्येक वर्षी मदतीमध्ये वाढ होईल असेही पुनीत दादा बालन यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. रवींद्र माळवदकर, पराग ठाकूर, उदय जगताप, सूर्यकांत पाठक, धीरज घाटे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री देवेदेवेश्वर सारसबाग संस्थेचे विश्वस्त रमेश भागवत, प्रसाद कुलकर्णी, विकास पवार, हेमंत रासने, दत्ता सागरे, अनिल सकपाळ, संजीव जावळे, शिरीष मोहिते, सुरेश जैन ,पियुष शहा, आशुतोष देशपांडे तसेच बहुसंख्य गणेशोत्सव मंडळाचे, जय गणेश व्यासपीठाचे कार्यकर्ते व ढोल ताशा पथकातील वादक उपस्थित होते.

आनंद सागरे यांनी मानपत्राचे वाचन केले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीकांत शेटे यांनी उपस्थीतांचे आभार मानले.

https://www.instagram.com/reel/C-413vhpfXa/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On MPSC Aspirants Protest | “…तर मी मी स्वतः आंदोलनात उतरेल”, शरद पवारांचा राज्य सरकारला इशारा, म्हणाले – “न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार”

Mundhwa Pune Crime News | मुंढवा: रस्त्यावरील खड्यातील पाणी अंगावर उडाल्याने कारचालकाला बेदम मारहाण

Harshvardhan Patil | शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर हर्षवर्धन पाटलांचे भाष्य; म्हणाले – “लोकांच्या भावना समजून…”

Pune Rural Police | पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाची पोलीस भरतीची लेखी परिक्षा 24 ऑगस्टला लोणी येथे

Suicide In Khadakwasla Dam | सेल्फी काढून नातेवाईकांना पाठवला अन् संपवलं आयुष्य; खडकवासला धरणात उडी मारून तरुणाची आत्महत्या