Punit Balan Group (PBG) | बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील 1100 कर्मचाऱ्यांना 15 वर्षांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून 8.50 कोटींचे विमा कवच
पुणे : Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’ने आपल्या सामाजिक कार्यात आणखी एक नवे पाऊल टाकले असून वन्यजीव पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बांधवगड राष्ट्रीय उद्यानात (Bandhavgarh National Park) काम करणाऱ्या तब्बल अकराशे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 15 वर्षांसाठी ‘जीवन विमा पॉलिसी’ (Jeevan Bima Policy) काढून त्यांना 8.5 कोटी रुपयांपर्यंतचे सुरक्षेचे कवच बहाल केले आहे.
बांधवगढ राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. बांधवगड 716 चौ. किलोमीटर क्षेत्रफळ असलेले, 1968 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर 1993 मध्ये हे उद्यान व्याघ्र प्रकल्प बनले. वन्यजीव आणि पर्यावरणाबाबत विशेष प्रेम असलेल्या ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याकडून या राष्ट्रीय उद्यानाला यापूर्वी 20 लीफ ब्लोअर मशीन भेट दिल्या आहेत. जंगलात आग लागल्यास आग विझवण्यासाठी या लीफ ब्लोअर मशीनचा मोठा ऊपयोग होतो. येथील वन विभागाचे कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून वेगवेगळ्या विभागात काम करतात. त्यामुळे येथील अकराशे कर्मचाऱ्यांना ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याकडून 15 वर्षांसाठी विमा कवच बहाल करण्यात आले आहे. या मदतीबाबत कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बालन यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
नुकत्याच झालेल्या एका समारंभात युवा उद्योजक पुनीत बालन यांनी विमा सुरक्षेबाबतची घोषणा केली. यावेळी उद्यानाचे अपर मुख्य वनरक्षक डॉ. बी. एस. अन्नीगेरी, मुख्य वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक एल. एल. उईके, प्रधान मुख्य वनरक्षक अतुल श्रीवास्तव, एसडीओ सुधी मिश्रा, नरसी ग्रुपचे नरसी डी. कुलरिया, वास्तूविशारद अनुज वकील, डीडी बीटीआर प्रकाश वर्मा, एसडीओ बीटीआर सुधीर मिश्रा, आरओ बीटीआर पुष्पा सिंग आणि डॉ. रमाकांत पांडा यावेळी उपस्थित होते. (Punit Balan Group (PBG))
‘‘वन्यजीव ही आपली खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. बांधवगड राष्ट्रीय उद्यानात अनेक दुर्मिळ असे पशुपक्षी आहेत. महत्वाचं म्हणजे आपला राष्ट्रीय प्राणी वाघांची संख्या सर्वांत जास्त याच उद्यानात आहे. या सर्वांची चांगल्या पध्दतीने काळजी घेता यावी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सरक्षण मिळावं या भावनेतून ही छोटी मदत करण्याचा मी प्रयत्न केला.’’
- पुनीत बालन (अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)
- Punit Balan (Chairman, Punit Balan Group)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक
Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!
Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)