Punit Balan Studios-Raanti Movie | चित्रपटगृहात ‘रानटी’चा धुमाकूळ ! सर्वच चित्रपटगृहांत प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल  प्रतिसाद

Raanti

पुणेरी आवाज – Punit Balan Studios-Raanti Movie | चित्रपटाच्या यशामागे अनेक घटक कारणीभूत असतात. जबरदस्त ॲक्शन सीन्स, दमदार डायलॉग आणि इमोशन ड्रामा याचं पॅकेज असलेल्या ‘रानटी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. अनोखे टिझर, लक्षवेधी पोस्टर्स, उत्कंठावर्धक ट्रेलर आणि आघाडीच्या कलाकारांच्या फळीमुळं रसिकांची उत्सुकता अक्षरश: शिगेला पोहोचली आहे. नायक आणि खलनायकात रंगणार सूडनाट्य बघायला प्रत्येकालाच आवडतं. त्यालाच ॲक्शनचा तडका देऊन त्या पार्श्वभूमीवर रंगणारा एका वेगळ्या जॉनरचा चित्रपट मराठीत आल्याने प्रेक्षक आणि समीक्षकांनीही या चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.

‘रानटी’ चित्रपट म्हणजे मनोरंजनाचा हुकुमी एक्का आहे अशी भावना सध्या प्रेक्षकवर्गात आहे. चित्रपटाचा वेग, निर्मितीमूल्य, त्याची मांडणी हे सगळं लार्जर दॅन लाईफ दाखविण्यात हा चित्रपट यशस्वी झाल्याच्या भावना प्रदर्शित झालेल्या टिझर, ट्रेलर वरून प्रेक्षक व्यक्त करतायेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ हा मराठीतला जबरदस्त ॲक्शनपट आहे.

प्रदर्शना आधीच ‘रानटी’ चे सर्व शो हाऊसफुल्ल झाले आहेत. ‘बुक माय शो वर या चित्रपटाची जोरदार तिकीट विक्री झाली आहे. टिकिटींग पोर्टलवर या चित्रपटाला उत्तम रेटींग मिळालं आहे.

‘रानटी’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून आलेल्या अभिनेते शरद केळकर यांचा डॅशिंग लूक ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांची वाहवा मिळाली आहे. शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर, संतोष जुवेकर, नागेश भोसले,जयवंत वाडकर, संजय खापरे, छाया कदम,अक्षया गुरव, कैलास वाघमारे, माधव देवचक्के, सुशांत शेलार,हितेश भोजराज, सानवी श्रीवास्तव,नयना मुखे या कलाकारांच्या भूमिकाही प्रेक्षक कौतुकास पात्र ठरल्या आहेत. यातील मारधाड, रोमांचक दृश्य, प्रसंगी प्रेक्षकांना श्वास रोखायला लावणारे ॲक्शनसीन खिळवून ठेवत असल्याच्या भावना प्रेक्षक व्यक्त करतायेत.

राज्यातील अनेक चित्रपटगृहांतून ‘रानटी’ प्रदर्शित होणार आहे. लेखन, अभिनय, गीत-संगीत, छायाचित्रण आणि तांत्रिक बाजू या सर्वच बाबतीत या चित्रपटाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Punit Balan Studios – Raanti Movie | पुनीत बालन स्टुडिओज निर्मित अ‍ॅक्शनपॅक्ड ‘रानटी’ आज चित्रपटगृहात


You may have missed