Purandar Assembly Constituency | पुरंदरमध्ये विजय शिवतारेंच्या विरोधात अजित पवारांनी दिला उमेदवार; शिवतारे म्हणाले – ‘उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?’
पुरंदर: Purandar Assembly Constituency | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर पुरंदर विधानसभा मतदारसंघ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातच आता अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजी झेंडे (Sambhaji Zende) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
लोकसभेला मदत करूनही अजित पवारांनी पुरंदरमधून शिवतारेंविरोधात उमेदवार का दिला?, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. संभाजी झेंडे यांना पुरंदरमधून रिंगणात उतरवण्याच्या अजित पवारांच्या निर्णयावर विजय शिवतारे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
विजय शिवतारे म्हणाले, ” लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात ज्याने सुनेत्रा पवारांना पाडण्याचा प्रयत्न केला त्याला अजितदादांनी तिकीट दिले, याबाबत मला आश्चर्य वाटते. पुरंदर हवेली मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर संभाजी झेंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संभाजी झेंडे यांनी सुनेत्रा पवारांना (Sunetra Ajit Pawar) पाडण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली त्यांना उमेदवारी दिली ही वैचारिक दिवाळखोरी आहे.”
ते पुढे म्हणाले, ” जेव्हा मी बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली होती तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तिन्ही नेत्यांसमोर शब्द दिला होता की पुरंदरचा किल्लेदार विधानसभेमध्ये पाठवा. तरी देखील अशा पध्दतीने संभाजी झेंडे यांची उमेदवारी का जाहीर केली?
निष्ठावान राष्ट्रवादीच्या नेत्याला संधी दिली असती तरी मला चालले असते. पण ज्यांनी सुनेत्रा पवारांना पाडण्यासाठी प्रयत्न केला त्याला उमेदवारी देताना स्वाभिमान कुठं ठेवला?”, असा सवाल विजय शिवतारे यांनी उपस्थित केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा