Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Vijay Shivtare - Sanjay Jagtap

पुणे: Purandar Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. पुणे शहरात ८ विधानसभा मतदारसंघ असून, जागा वाटपात महायुतीमध्ये (Mahayuti) भाजपला कोथरुड (Kothrud Assembly), पर्वती (Parvati Assembly), शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly), पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment Assembly), खडकवासला (Khadakwasla Assembly) आणि कसबा (Kasba Peth Assembly) हे सहा मतदारसंघ आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे (Ajit Pawar NCP) वडगाव शेरी (Vadgaon Sheri Assembly), हडपसर (Hadapsar Assembly) मतदारसंघ आहेत.

हडपसर मतदारसंघ शिंदेसेनेला (Shivsena Shinde Group) मिळण्यासाठी प्रयत्न केला जात होता. त्यासाठी शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) प्रयत्न करत होते. मात्र, हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदेसेनेला पुण्यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे शिंदे सेनेचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

तर दुसरीकडे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे पुरंदरमध्ये काँग्रेसचे आमदार (Congress MLA) संजय जगताप (Sanjay Jagtap MLA) विरुद्ध विजय शिवतारे यांच्यामध्ये लढत होणार आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाने २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.
त्यामध्ये पुरंदरमधून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
त्यामुळे या मतदारसंघात दुरंगी लढत होणार आहे. पुरंदर विधानसभा मतदार संघातून २००९ च्या निवडणुकीत विजय शिवतारे शिवसेनेकडून विजयी झाले होते. २०१४ साली सुद्धा त्यांनी चुरशीची लढत देत पुरंदरचा गड पुन्हा एकदा जिंकला होता.

मात्र २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या संजय जगताप यांनी शिवतारेंचा पराभव करत विजय मिळवला होता.
विजय शिवतारे यांनी शिवसेना पक्षातून निवडणूक लढवली होती.
तेव्हा बंडखोरी झाली नव्हती. आता मात्र शिवसेनेचे दोन गट पडले आहेत.
त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पुनरावृत्ती की शिंदे गटाला पुण्यात
एक आमदार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Baramati Assembly Election 2024 | ‘बारामतीकर युगेंद्र पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील’, युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवर शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले – ‘बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे त्यानुसार…’

Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार

Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा