Radhakrishna Vikhe Patil | राधाकृष्ण विखेंचे रोहित पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – “तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब फोडली, किती जणांचे राजकीय करियर…”

Radhakrishna Vikhe Patil-Rohit Pawar

अहमदनगर : Radhakrishna Vikhe Patil | आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर खरमरीत टिका केली आहे. ही टिका मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यांनीही मग रोहित पवार यांना सुनावत आजोबा शरद पवारांनी (Sharad Pawar) काय-काय केले याची आठवण करून दिली आहे. शिवाय रोहित यांच्या आरोपांवर भडकून त्यांनाच जाब विचारला आहे.

पवार आणि विखे पाटील हे जुने राजकीय वैर आहे. शरद पवारांनी बाळासाहेब विखे पाटील यांना नेहमीच विरोध केला आहे. अहमदनगरच्या राजकारणात विखे-पाटील यांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे काम शरद पवारांनी वारंवार केल्याचा त्यांच्यावर आरोप होतो.

शरद पवारांमुळेच बाळासाहेब विखे पाटील (Balasaheb Vikhe Patil) हे शिवसेनेत गेले होते. त्यांतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. या लोकसभा निवडणुकीतही राधाकृष्ण विखे पाटील यांचे पत्र सुजय विखे पाटील यांचा शरद पवारांच्याच उमेदवाराने पराभव केला आहे.

पक्ष फोडले. कुटुंब फोडली. हेच काय ते देवेंद्र फडणवीस यांचे कर्तुत्व अशी टिका रोहित पवार यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्यात दोन पक्ष फुटले. कुटुंबात त्यांनीच फुट पाडली. अशा प्रकारचे राजकारण या आधी कधीच महाराष्ट्रात झाले नव्हते असेही रोहित पवार असे म्हणाले. त्यांची ही टीका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

याबाबत भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
ते म्हणाले, “रोहित पवार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडले,
घरं फोटली तर त्यांनी पहिला हा प्रश्न त्यांचे आजोबा शरद पवार यांना विचारला पाहीजे.
शरद पवारांनी आपल्या हयातीत किती कुटुंब फोडली? किती कुटुंबाची धुळधाण उडवली?
किती जणांचे राजकीय करिअर उद्धवस्त केले? हे सर्व प्रश्न त्यांनी शरद पवारांना विचारले पाहीजे.
त्याची उत्तर मिळाल्यानंतर ते अशी टिका करणार नाहीत”, असेही विखे पाटील यांनी सांगितले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

You may have missed