Radhakrishna Vikhe Patil | अहमदनगर जिल्ह्याला ‘अहिल्यानगर’ नाव देण्यास रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदिल; नामांतराचा मार्ग सुकर
नगर: Radhakrishna Vikhe Patil | मागील अनेक दिवसांपासून अहमदनगरचे अहिल्यानगर (Ahilya Nagar) असे नामांतर करावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) शासन दरबारी केली होती. त्यानंतर अनेक सामाजिक संघटनांकडूनही शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच अहमदनगरचे नाव अहिल्यानगर व्हावे यासाठी यात्राही काढण्यात आली होती. (Ahmednagar News)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीदिनीच आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी मागणी केल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अहमदनगरच्या नामांतरावर शिक्कामोर्तब केले होते. अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर होणारचं, असं ठामपणे फडणवीसांसह एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. पुढे हा निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली. (Radhakrishna Vikhe Patil)
याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. अहिल्यानगर नाव देण्यास विभागाची कोणतीही हरकत नाही असे पत्र दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग सुकर झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
अहिल्यानगर नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रीया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत होत
असल्याने प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी केले आहे.
अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वे स्टेशन देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे. नगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यातील पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)
Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास
Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक