Rahul Gandhi Join Pandharpur Ashadhi Wari | ठरलं! यंदा राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी होणार; जाणून घ्या
पुणे : Rahul Gandhi Join Pandharpur Ashadhi Wari | लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवार (दि. १४) रोजी वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी त्यांना निमंत्रण दिलेले होते. यंदा पहिल्यांदाच राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. या वारीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा सहभाग असतो. या वारीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पायी चालले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारीचे स्वागत केले आहे. (Rahul Gandhi Join Pandharpur Ashadhi Wari)
भारत जोडो यात्रेच्या वेळी काँग्रेसचे नेते, लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी देशभर दौरा केला होता.
यानंतर यंदा पंढरीच्या वारीत एक दिवस वारी अनुभवणार आहेत.
राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचे पंढरीच्या वारीत सहभागी होणे राजकीय दृष्टिकोनातून महाविकास आघाडीला फायदेशीर असल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड