Rahul Gandhi On Maharashtra Congress | विधानसभेच्या अपयशानंतर काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होणार; पराभवाच्या अहवालानंतर राहुल गांधींनी केल्या सूचना
मुंबई : Rahul Gandhi On Maharashtra Congress | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. दरम्यान याची दखल आता पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आपला अहवाल दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना दिला आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांनी संधी देण्याबाबत राहुल गांधी यांनी सूचना केल्याची माहिती आहे. पुढील आठ दिवसात याबाबत बैठक होणार आहे.
काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले मात्र, त्याचा फायदा उचलण्याचे सोडून राज्यातील नेते आम्हीच मोठे भाऊ, आमचाच मुख्यमंत्री होणार, अशी जाहीर वक्तव्ये करू लागले याबाबतची चेन्नीथला यांनी आपल्या अहवालात संबंधित नेत्यांवर अपरिपक्व असा शिक्का मारला असल्याची माहिती मिळत आहे.
विधानसभेतील पराभवानंतर चेन्नीथला राज्यात एकदाही आले नाहीत. त्यांनी पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेण्याबाबत प्रदेश शाखेला कळवले. तशी बैठक झालीही, तर त्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेकांनी शरसंधान साधले व या पराभवाला तेच जबाबदार असल्याची टीका केली. त्यावरून प्रदेश शाखेने विदर्भातील एका पराभूत आमदाराला नोटीस बजावली.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना महाराष्ट्रात विजयाची अपेक्षा होती. ती दूरच राहिली, उलट दारुण पराभव झाला. त्यामुळे तेही पक्षाच्या प्रदेश संघटनेवर संतप्त झाले. त्यांनी चेन्नीथला यांना याबाबत विचारणा केली. त्यामुळेच चेन्नीथला यांनी या पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडे दिला आहे.
त्यानंतर आता राहुल गांधी यांनी निष्ठावान, तरुण चेहऱ्यांना ज्यांची फार मोठी राजकीय पार्श्वभूमी नाही अशांना संघटनात्मक पातळीवर संधी देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. काँग्रेसच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यस्तरावर तर बदल अपेक्षित आहेच, पण शहर व जिल्हा स्तरावरही हा बदल झिरपावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
मोठी शहरे व जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये झालेल्या पराभवाची कारणे शोधली गेली
तर संघटनेचे अस्तित्वच राहिले नसल्याने हा पराभव झाला असल्याचे लक्षात येईल.
त्यामुळेच फक्त प्रदेशातच नाही तर शहरे व जिल्हा, तालुका स्तरावरही खांदेपालट केली जावी, अशी चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी