Rahul Kalate News | चिंचवडमधील थेरगावातील बुथवर पैसे वाटप होत असल्याचा राहुल कलाटेंचा आरोप; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

Rahul Kalate

पुणेरी आवाज – Rahul Kalate News | भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकडून चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly Election 2024) संघातील विविध बूथवर पैसे वाटप होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) Sharad Pawar NCP पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

चिंचवड विधानसभा संघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार राहुल कलाटे यांनी आरोप केला आहे की, थेरगाव परिसरातील साने गुरूजी आदर्श विद्यानिकेतन शाळा, जय मल्हार नगर, थेरगाव येथील 290 ते 293 क्रमांकाच्या बूथवर तसेच कीर्ती नगर थेरगाव येथील न्यु मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कुल मतदान केंद्रावरील 264 ते 268 क्रमांकाच्या बुथवर स्लिप देण्याच्या बहाण्याने पैसे वाटप केले गेले. खुलेआम मतदारांना पैसे वाटप केल्याने आदर्श आचार संहिता भंग होत आहे. हा प्रकार तात्काळ थांबवून संबंधीतांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ही कलाटे यांनी केली आहे. दरम्यान भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

21 उमेदवार रिंगणात

चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राहुल कलाटे आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात तगडी लढत होत आहे. त्यांच्यासह इतर 21 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed