Rahul Narwekar | अर्थखात्याबाबत गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर नार्वेकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले – ‘महायुतीत एकमेकांविषयी…’

मुंबई: Rahul Narwekar | जळगाव येथे शनिवारी हातपंप आणि वीजपंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्याने चर्चा सुरु आहेत. (Rahul Narwekar)
“अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. पण पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले. दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो,” असे विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते.
गुलाबराव पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या खात्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राजकीय वर्तुळात महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुतीतील नेते मित्रपक्षांवर टीका करताना दिसत आहेत.
विशेषता शिवसेना आणि भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केले. त्यावर आता विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
महायुतीमधील नेते अजित पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. अशातच शुक्रवारी मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थखात्याबाबत धक्कादायक विधान केले. अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आता या सगळ्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे.
शिवसेनेचे नेते अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत.
त्यामुळे महायुतीमध्ये सर्वकाही ठीक आहे का असा सवाल राहुल नार्वेकर यांना करण्यात आला.
त्यावर बोलताना नार्वेकर यांनी महायुतीत सर्व काही ठीक चालले आहे, असं म्हटलं.
” एका घरात ३-४ लोक राहतात तेव्हा काही मतभेद होऊ शकतात.
याचा अर्थ काही गडबड आहे असे नाही. महायुतीत सर्व काही ठीक चालले आहे.
महायुतीत एकमेकांविषयी तेवढेच प्रेम आणि आदर आहे”, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी