Raigad Crime News | आजीने नातवासह इमारतीवरुन उडी घेत संपवले जीवन; रायगड हादरलं

Suicide

रायगड : Raigad Crime News | एका आजीने आपल्या नातवासोबत एका इमारतीवरुन उडी मारून आपले जीवन संपवले आहे. या घटनेत आजीचा जागीच, तर नातवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. (Suicide News)

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना रायगड येथील रोहा येथे घडली आहे. उर्मिला सिद्धाराम कोरे (वय ५२) असे उडी मारणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिने तिच्या दोन वर्षाच्या आपल्या नातवासहित राहत्या बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यामागचे कारणे अद्याप अस्पष्ट असून, या घटनेचा पुढील तपास रोहा पोलीस घेत आहेत. मात्र, या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. (Raigad Crime News)

You may have missed