Raigad News | प्रवाशांनी भरलेली बस पुराच्या पाण्यात दामटवली; प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत स्टंटबाजी; चालक निलंबित (Video)

Amba River Bridge

रायगड : Raigad News | राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. नदी-नाले ओसंडून वाहताना दिसत आहे. ठिकठिकाणी रस्त्यांवर नदीचं स्वरूप आलं आहे. अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटलेला आहे. दरम्यान प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. त्यातच आता रायगड मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Raigad News)

एसटी महामंडळाच्या चालकाने (ST Bus Driver) बस थेट पुलावरून वहात असलेल्या पाण्यातून चालवली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. पाली येथून पेणला जाणाऱ्या एसटी बस चालकाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना आज (दि.२४) सकाळी अंबा नदीवरील पुलावर (Amba River Bridge) भेरव गावाजवळ घडली आहे.

अंबा नदीचे पाणी पुलावरून वहात असताना धोकादायक परिस्थितीत चालकाने स्वतःसह प्रवाशांचा जीव धोक्यात घालून पुलावरून वाहत्या पाण्यातून बस नेली. यासंदर्भात संबंधित चालक व वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

प्रवासी आणि नागरिकांच्या मागणीची दखल घेत पेण आगाराचा चालक यु.एम बनसोडे
यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
एसटीचे रायगड विभाग नियंत्रक दीपक घोडे यांनी ही माहिती दिली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadakwasla Dam | खडकवासला धरण 100 टक्के भरले ! मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात; नागरिकांना खबरदारीचे आवाहन

Kothrud Hit & Run Case | कोथरूडमध्ये हिट अँड रन; खाजगी बसने दुचाकीस्वारासह इतर वाहनांना उडवले (Video)

Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक

Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद

You may have missed