Railway News | रेल्वेची मोठी घोषणा ! पुणे-हरंगुळ (लातूर), पुणे-कोल्हापूर आणि सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस गाड्यांचा कालावधी वाढवला
पुणे : Railway News | | प्रवाशांची गर्दी कायम असल्याने रेल्वेने पुणे विभागातील काही गाड्यांना मुदत वाढ दिली आहे. यामध्ये पुणे विभागातून हंगामी काळासाठी धावणारी पुणे-हरंगुळ (लातूर), पुणे-कोल्हापूर आणि सोलापूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस या तीन गाड्यांचा समावेश आहे. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे.
प्रवाशीसंख्या अजूनही जास्त असल्याने रेल्वेने पुणे-कोल्हापूर विशेष गाडी नं. ०१०२३ आणि ०१०२४ या दोन्ही गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत. या दोन गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या, परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
- पुणे-हरंगुलदरम्यान धावणारी दैनिक विशेष गाडी नं ०१४८७ आणि ०१४८८ या दोन गाड्या ३० जूनपर्यंत धावणार होत्या. मात्र, प्रवाशी संख्या अजूनही जास्त असल्याने या दोन्ही गाड्या ३० सप्टेंबरपर्यंत धावणार आहेत. यामुळे धाराशिव, लातूरला जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
- सोलापूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी २५ जूनपर्यंत दर मंगळवारी धावत होती.
आता गाडी नं. ०१४३५ सोलापूर- एलटीटी आणि गाडी नं ०१४३६ एलटीटी ते सोलापूर साप्ताहिक विशेष
या दोन्ही गाड्यांची कालावधी वाढवण्यात आला असून,
या दोन्ही गाड्या २५ सप्टेंबरपर्यंत नियमित वेळेनुसार धावणार आहेत.
या तीनही गाड्यांच्या दिवस, वेळ, संरचना आणि थांबा यामध्ये कोणताही बदल होणार नसून,
विशेष शुल्कावर विशेष गाड्यांचे तिकीट बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर सुरू आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड
Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा