Railway TC Suicide News | मालगाडीसमोर उडी घेत रेल्वे टीसीची आत्महत्या; अकोला येथील धक्कादायक घटना

अकोला : Railway TC Suicide News | अकोल्यातील (Akola Crime) मुर्तिजापूर रेल्वे स्थानकावर एका तिकीट चेकरने (टीसी) आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. मूर्तिजापूर येथून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या मालगाडीसमोर उडी येऊन टीसीने आत्महत्या केली, सुमेध मेश्राम (वय 40) असे आत्महत्या केलेल्या टीसीचे नाव आहे.
घरगुती तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घरगुती कारणावरून पोलीसात तक्रार झाली होती, मूर्तिजापूर शहर पोलीस अटक करायला गेले होते, पण ड्युटी सुरू असल्याने ड्युटी संपल्यावर अटक करणार होते, तेवढ्यात त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे.
सुमेध मेश्राम हे घरगुती कारणामुळे तणावात होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. फलाट क्रमांक एकवर कर्तव्य बजावत असताना सुमेधने अचानक मूर्तिजापूरवरून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीखाली उडी घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला.