Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
लोणावळा : Rain In Lonavala Khandala | पुणे जिल्ह्यातील पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळा येथील वातावरण बदलले आहे. लोणावळ्यात अधूनमधून पावसाच्या सरी होत असताना धुके पसरले आहे. यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना आल्हाददायक वातावरणाचा आनंद मिळत आहे. राज्यभरातून नव्हे तर देशभरातील पर्यटक लोणावळा आणि खंडाळा येथे येतात. लोणावळ्यातील विविध स्थळांना भेट देत निसर्गाचा आनंद लुटतात.
पावसाळ्यात लोणावळ्यातील निसर्ग अधिकच खुललेले असते. यामुळे याकाळात पर्यटकांची गर्दी असते. लोणावळा व खंडाळ्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. दाट धुके आणि पावसाच्या सरी अंगावर झेलत वर्षाविहारासाठी रविवारी पर्यटकांची गर्दी दिसत होती.
लोणावळ्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रविवारी सकाळी १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. येथील थंड व आल्हाददायी वातावरणासह वर्षाविहाराचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. पर्यटन हा लोणावळा आणि खंडाळ्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे.
शनिवार, रविवार सुट्यांमुळेही वर्षाविहारासाठी पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. लायन्स पॉइंट, राजमाची उद्यान, भुशी धरण, भाजे लेणी, धबधबा, कार्ला लेणी पर्यटकांच्या सर्वाधिक आकर्षणाचे मुख्य केंद्र आहेत. हे पॉइंट पर्यटकांच्या गर्दीने दिवसभर गजबजून गेली होती. पवना परिसरालाही पर्यटक भेटी देत आहेत. गेल्या रविवारी भुशी येथे घडलेल्या दुर्घटनेचे सावट या वीकेंडला पर्यटनावर होते.
पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली असून, पर्यटकांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी लोणावळा पर्यटकांनी हाउसफुल्ल झाले होते.
पर्यटकांनी आपला मुक्काम खासगी बंगले आणि ग्रामीण भागाकडे वळविला आहे.
येथील प्रसिद्ध चिक्की. जेली खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उड़ते आहे.
वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असून भुशी धारण,
लोहगड किल्ला , भाजे, लायन्स पॉईंट, आदी पर्यटन स्थळांवर खबरदारी घेण्यात येत आहे.
सायंकाळी पाच वाजताच्या नंतर पर्यटकांना पोलिसांकडून मनाई करण्यात येत आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Raigad ACB Trap | बांधकामाचे देयक मंजूर करण्यासाठी वित्त अधिकाऱ्याला लाच घेताना एसीबीकडून अटक
Ajit Pawar Vs Sharad Pawar | पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला लवकरच धक्का,
माजी महापौरांसह 15 ते 20 नगरसेवक ‘या’ मुहूर्तावर वाजवणार तुतारी!
Pimpri Chinchwad Cyber Cell | पिंपरी : कर्ज फेडण्यासाठी दिघीतील व्यक्तीला अडीच कोटींचा गंडा,
सायबर पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या (Video)