Raj Thackeray On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून राज ठाकरेंनी सरकारवर डागलं पुन्हा टीकास्र; म्हणाले – “जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा…”
मुंबई : Raj Thackeray On Badlapur School Girl Incident | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे.
” बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी कालपण म्हंटलं तसं यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं “, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, ” मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का?”, असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकास्र डागलं.
ते पुढे म्हणाले, जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,
ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आला आहे
याचा मला अभिमान आहे.
पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray On Badlapur School Girl Incident)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून
Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”
Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?