Raj Thackeray On Eknath Shinde-Ajit Pawar | ‘पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नाही’, सत्तासंघर्षांवरून राज ठाकरेंचा शिंदेंसह अजित पवारांना टोला; म्हणाले…

Raj Thackeray-Eknath Shinde-Ajit Pawar

मुंबई: Raj Thackeray On Eknath Shinde-Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तसेच, राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात सभाही घेतल्या होत्या. दरम्यान आता आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

राज ठाकरे यांनी निवडणुकीबद्दल माध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केलं आहे. पक्षाचे नाव व चिन्ह घेणं योग्य नसल्याचे म्हणत राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.

राज ठाकरे म्हणाले, ” कुठल्याच पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी होता कामा नये. कारण मी ती गोष्ट केलेली नाही. मी जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्याकडे ३७ आमदार आणि ७ ते ८ खासदार आले होते. मी त्यांना सांगितलं मला पक्ष फोडून नवीन पक्ष काढायचा नाही.

मला असली गोष्ट नकोच आहे. त्यापेक्षा सत्ता न आलेली बरी आहे. मी कमजोर किंवा कमकुवत आहे का. लोक एक दिवस माझ्या हातात सत्ता देतील. बाकीच्या राजकीय पक्षांना सत्ता हातात यायला इतकाच वेळ लागला. माझा पक्ष फुटल्याचा किंवा चिन्ह गेल्याचा नाही तर या प्रक्रियेचा विरोध आहे.

फोडाफोडीचे राजकारण मी समजू शकतो पण नाव आणि चिन्ह गेलं ही गोष्ट योग्य नाही. धनुष्यबाण उद्धव ठाकरेंची कमाई नाही. ती बाळासाहेब ठाकरेंची कमाई आहे. अशा प्रकारचे राजकारण मला आवडत नाही,” असेही राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी

Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत

Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा