Raksha Bandhan | पोलिसांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी; एनएसएस स्वयंसेवकांचा उपक्रम

Tying Rakhi To Police

पुणे: भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांनी कात्रज पोलिस ठाण्यात रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमात अंतर्गत 20 स्वयंसेवकांनी 50 हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या अविरत सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल कदम, प्रा. प्रशांत यादव, प्रा. तुलसीहार पाटील आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विदुला सोहोनी, उपप्राचार्य डॉ सचिन चव्हाण आणि डॉ सुनीता जाधव यांनी मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन केले.कात्रज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी दशरथ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या समाजसेवेच्या कार्याची प्रशंसा केली.

स्वयंसेवकांनी या सणाच्या माध्यमातून पोलिसांचे समाजासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे,
याची जाणीव व्यक्त केली. तर पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या या स्नेहभावनेचे कौतुक केले.
या उपक्रमामुळे पोलिस आणि विद्यार्थी यांच्यातील आपुलकीची भावना अधिक दृढ झाली.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

Attack On Female Doctor | धक्कादायक: मद्यधुंद रुग्णाची महिला डॉक्टरला मारहाण; मुंबईतील सायन रुग्णालयातील प्रकार

Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य