Ram Shinde On Rohit Pawar | रोहित पवार बैठकीत वस्तू फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

पुणेरी आवाज – Ram Shinde On Rohit Pawar | भारतीय जनता पार्टीचे नेते (BJP Leader) आणि विधानपरिषद आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे (Sharad Pawar NCP) आमदार रोहित पवार यांच्यावर खळबळजनक आरोप करत म्हटले आहे की, रोहित पवार हुकूमशाही पध्दतीने कारभार करतात. चालू बैठकीत ते मोबाईल, पाण्याच्या बाटल्या, चाव्या अशा वस्तू फेकून मारतात.
रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed Assembly Constituency) भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मागील काही दिवसांत रोहित पवार यांच्या काही सहकार्यांनी त्यांची साथ सोडत भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे जणू आमदार राम शिंदे यांना बळ मिळाले आहे. त्यांनी रोहित पवारांवर आरोप करताना म्हटले आहे की, रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली आहे. त्यांची काम करण्याची पध्दत लोकांना पटलेली नाही. त्यांच्या वागणूकीत अरेरावी, हुकूमशाही आहे. ते चालू बैठकीत मोबाईल, पाण्याच्या बाटल्या, चाव्या अशा वस्तू फेकून मारतात. मी जर आमदार झालो नसतो तर, त्यांनी नक्कीच 10-20 लोकांना मारहाण केली असती. मी विधानपरिषद आमदार झाल्यामुळे त्यांचा पारा अर्ध्यावर आला असल्याचे लोकांकडून मला सांगितले जात आहे.
रोहित पवारांच्या वागणूकीमुळे पक्षातून बाहेर पडलो
दरम्यान रोहित पवार यांचे समर्थक आणि कर्जत-जामखेडच्या राजकारणात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले मधुकर राळेभात यांनी नुकताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांनी देखील रोहित पवार यांच्यावर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मी 30 वर्ष शिवसेनेचे काम केले. त्यानंतर शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या तालुक्यात राष्ट्रवादीचे वातावरण तयार करायचे काम मी केले. रोहित पवार यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. या तालुक्यातील भूमीपुत्र असलेले कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांना पाडून रोहित पवार निवडून आणलं. परंतू रोहित पवार यांचे कार्यकर्त्यांबरोबर जे वागणं आहे ते मला आवडलं नाही. म्हणून मी पक्ष सोडायचा निर्णय घेतला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते,
दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”