Ramdas Athawale On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या ताकदीचा फायदा निवडणुकांमध्ये होत नाही, त्यांना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य

पुणेरा आवाज – Ramdas Athawale On Raj Thackeray | राज ठाकरे यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. असे असले तरी त्यांच्या ताकदीचा फायदा महायुतीला (Mahayuti News) निवडणुकांमध्ये होत नाही. त्यामुळे त्यांना सेाबत घेऊ नका. असे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी डहाणू येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले. (Ramdas Athawale On Raj Thackeray)
लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेतल्यामुळे भाजपाला नुकसान झाले असे तर्क काढण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवार यांना टार्गेट केले जात आहे. अशातच केंद्रीय मंत्री आठवले यांनी अजित पवार यांच्यामुळे नुकसान झालेले नाही असे म्हटले आहे.
राज ठाकरेंना महायुतीत घेणार का या प्रश्नावर आठवले म्हणाले की, आम्ही असताना राज ठाकरेंची गरज काय? राज ठाकरेंचा महायुतीला फायदा झालेला नाही. त्यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. त्यांना मानणारे अनेक कार्यकर्ते जरी असले तरी त्यांच्या या ताकदीचा फायदा निवडणुकांमध्ये होत नाही. त्यामुळे त्यांना सोबत घेऊ नका. उलट अजित पवार यांच्यामुळे महायुतीचे काही एक नुकसान झालेले नाही. ज्या 17 जागा आल्या आहेत त्यात अजित पवारांचाही वाटा आहे. असे ही आठवले म्हणाले.
काँग्रेस संपेल पण, देशातील आरक्षण संपणार नाही
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरक्षण संपविण्याच्या वक्तव्याचा समाचार घेत आठवले म्हणाले की, राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस (Congress Party) पक्ष संपेल पण, देशातील आरक्षण कदापी संपणार नाही. अशी वक्तव्ये करणे त्यांना शोभत नाही. राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी ही आठवले यांनी यावेळी केली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा