Ramdas Athawale On Raj Thackeray | राज ठाकरे यांची हवा आता निघून गेली; रामदास आठवले यांची टीका
ऑनलाइन टीम – Ramdas Athawale On Raj Thackeray | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सरकार सोबत ठेवण्यात रस असल्याचे म्हटल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची त्याला हरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज ठाकरे यांची हवा आता निघून गेली असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला. मात्र, मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून चाचपणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि आमचे विचार मोठ्या प्रमाणावर एकसारखे आहेत. त्यांना सरकारसोबत ठेवण्यात आम्हाला नक्कीच रस आहे. महापालिकेच्या निवडणुकीत जिथे शक्य असेल, तिथे त्यांना सोबत घेता आले तर आम्ही प्रयत्न करू, असे वक्तव्य केले. यानंतर मनसे महायुतीत सहभागी होणार का? या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यावरून आठवले यांची हरकत असल्याचे स्पष्ट होत आहे.
या विषयी आठवले म्हणाले की, राज ठाकरे म्हणाले होते की, आमच्याशिवाय सरकार येणार नाही, परंतू तसे झाले नाही. त्यांच्या सभेला गर्दी होते, पण त्यांच्या जागा निवडून येत नाही. त्यांची हवा या निवडणुकीत निघून गेली आहे. मी असताना त्यांची गरज का? ते युतीत येतील असे मला वाटत नाही. असे ही आठवले म्हणाले.
मुस्लिम विरोधी भूमिका घेणे योग्य नाही
आठवले म्हणाले की, राज ठाकरे यांना सोबत घेणे योग्य ठरणार नाही. मुस्लिम विरोधी भूमिका घेणे योग्य नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले. त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात भगवा, निळा, हिरवा रंग होता. त्यांच्या झेंड्याचा रंग आता बदलला आहे. त्यांनी फक्त भगवा रंग हातात घेतला आहे. भगव्या रंगाचा अर्थ महान आहे. भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिम विरोधी नाही. जे मुस्लिम पाकिस्तानला बळ देतात त्याच्या विरोधी आम्ही आहोत.
मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता.
त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार असल्याचे बोलले जात आहे.
मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Ramdas Athawale On Raj Thackeray)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला