Ramraje Naik Nimbalkar | “…अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे”, रामराजेंचा थेट इशारा; फलटणमध्ये राजकीय हालचालींना वेग

Ramraje Naik Nimbalkar

फलटण : Ramraje Naik Nimbalkar | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून महायुती (Mahayuti Seat Sharing Formula) आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा (Mahavikas Aghadi Seat Sharing Formula) निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपा (BJP) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील (Ajit Pawar NCP) अनेकजण तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत.

समरजित सिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांनी तुतारी (Tutari) हातात घेतल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हातात घेण्याचा इशारा दिला आहे. फलटणमध्ये महायुतीत फूट पडल्याचे चित्र आहे.

भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsinha Naik-Nimbalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासूनच शाब्दिक वार सुरू आहेत.

अजित पवार यांचा फलटण दौरा असून, त्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये बैठक झाली. या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपाच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

शेवटी काय करायचे आणि काय नाही, हे आपल्या हातात राहिलेले नाही. ते भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाचे त्यांचे कार्यकर्ते सांभाळण्याचे काम आहे.

त्यामध्ये सुधारणा झाली तर ठीक आहे. आता प्रश्न तुम्ही जो मांडला आहे.
त्याबाबत तुम्ही तीन महिन्यापूर्वी तुतारी सांगितली. आपले भाजपासोबत भांडण नाही.
आपण हिंदूत्व, मुस्लीम असे काही करत नाही. आपली तक्रार फक्त रणजितसिंह नाईक निंबाळकरांबाबत आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे साथीदार गल्लोगल्ली दहशत करत आहेत.
या दहशतीला सपोर्ट करु नका, एवढीच आपली तक्रार आहे. तेवढ त्यांना सांगून बघू.
फरक पडला तर ठीक, अन्यथा तुतारी वाजवायला किती वेळ लागणार आहे,
असा थेट इशारा रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला आहे.

दरम्यान, शरद पवारांशी फारकत घेतल्यापासून रामराजे निंबाळकर अजित पवारांसोबत होते.
आता स्थानिक पातळीवरील वादामुळे तुतारी सोबत जाण्याचा इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीतही रामराजे निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
रामराजेंना थांबण्यात अजित पवार यांना यश आले नाही, तर हा मोठा धक्का बसू शकतो, असे म्हंटले जात आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed