Raosaheb Danve – BJP Executive Meeting In Pune | ‘पंतप्रधान मोदींच्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू’ – रावसाहेब दानवे

Raosaheb Danve

पुणे : Raosaheb Danve – BJP Executive Meeting In Pune | आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपाकडून महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल (Shiv Chhatrapati Sports Complex Balewadi) येथे पार पडत आहे. अधिवेशनाच्या प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांंवरील तयारीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू असा विश्वास भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

देशात पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडतो. मोदींनी गेल्या काही वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. त्यामुळे त्याच योजनांच्या जोरावर आपण विधानसभा जिंकू, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. भाजपचे अधिवेशन आज बालेवाडीत सुरू आहे. त्यामध्ये दानवे यांनी मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशात राष्ट्रीय नेत्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawade), भाजपचे महाराष्ट्र प्रभारी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw), भुपेंद्र यादव (Bhupender Yadav), पीयूष गोयल (Piyush Goyal), आशिष शेलार (Ashish Shelar), पंकजा मुंडे (Pankaja Munde, मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) उपस्थित आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

दानवे म्हणाले, “आपण १० कोटी लोकांना मोफत गॅस दिला आहे. हर घर जल योजना आणली. १४ कोटी लोकांना नळाचे पाणी दिले. शेतकरी यांच्या खात्यात १२ हजार रूपये टाकले जात आहेत. लोकोपयोगी योजना करूनही लोकसभेत आपल्याला पराभव मिळाला. आज सर्व पक्ष एकत्र आले आणि मोदींचा मुकाबला करत आहेत. ते सर्व एकत्र आले तरी मोदी हेच पंतप्रधान आहेत. मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली. आता लवकरच तिसरा क्रमांक पटकावू. विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं. चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला. पण तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आलेय. (Raosaheb Danve – BJP Executive Meeting In Pune)

जगातले लोकं आपली तारीफ करतात आणि राहुल गांधी लंडनला जाऊन भारतात कायदा सुव्यवस्था बिघडली असे म्हणतात. खरंतर यापुर्वी त्यांच्या सरकारने देशात आणीबाणी आणली होती आणि अराजकता पसरवली. या निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता. मग ते म्हणतात संविधान बदलणार. पण भाजप संविधान बदलणार नाही.
ते खोटं बोल पण रेटून बोल असं करत आहेत. भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही.
आम्ही तो कधीच बदलणार नाही. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. तयारीला लागा.
आपल्याला जिंकायचे आहे, असे वक्तव्य दानवे यांनी केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Attack On Digital Content Creator Lady | पुण्यामध्ये भररस्त्यात महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करणारा अटकेत

BJP Executive Meeting In Pune | केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन सुरु

Manorama Khedkar | पोलीस कोठडीत देखील पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरचा रुबाब कमी होईना! जेवण बेचव असल्याची तक्रार

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत भाजपच ‘दादा’; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 40 जागात गुंडाळणार?

You may have missed