Raosaheb Danve On Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे बरोबर असते तर आणखी मोठं बहुमत मिळालं असतं’, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य; राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई : Raosaheb Danve On Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले. दरम्यान ५ डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान मुख्यमंत्री पदी कोण असणार? याबाबतचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. गृह आणि महसूल खात्यावरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील यावर भाष्य केले आहे. मात्र, याचवेळी त्यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे.
भाजपच्या काही नेत्यांना उद्धव ठाकरेंबाबत अजूनही आस्था आहे. उद्धव ठाकरे हे भाजप बरोबर असायला हवे होते असं त्यांना वाटतं. अशी वारंवार वक्तव्यही त्यांच्याकडून केली गेली आहेत. टायवरून आता दानवे यांनीही भाष्य केले आहे. “ठाकरे सोबत असते तर आज मिळालेल्या बहुमतापेक्षा अधिक जास्त बहुमत मिळालं असतं”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, ” २०१९ साली आमच्या महायुतीला जवळपास १६५ ते १६७ जागा मिळाल्या होत्या.
मात्र, तेव्हा शिवसेना संजय राऊतांच्या बोलण्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली.
जर शिवसेना (उद्धव ठाकरे) काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर गेली नसती
तर असा कारभार केला असता जो पहिल्यांदा २०१४ ते २०१९ या कार्यकाळात झाला.
त्या कारभाराच्या आधारावर आज जेवढं बहुमत मिळालं त्यापेक्षा जास्त बहुमत आम्हाला मिळालं असतं”,
असे रावसाहेब दानवे यांनी म्हंटले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी