Ravet Pune Crime News | पिंपरी: जागेच्या व्यवहारात महिलेची फसवणूक, डेव्हलपर्सवर गुन्हा दाखल

पिंपरी : Ravet Pune Crime News | जागेची खरेदी देण्याच्या बहाण्याने महिलेकडून पैसे घेतले. मात्र, जागेची खरेदी करुन दिली नाही. तसेच महिलेला दिलेला धनादेश बाऊन्स करुन 4 लाख 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार एप्रिल 2019 ते जून 2024 या कालावधीत रावेत येथील डेव्हलपर्सच्या कार्यालयात घडला आहे. याप्रकरणी रावेत पोलिसांनी (Ravet Police Station) एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माधुरी जयकुमार शहापुरे (वय-49 रा. चिखली) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार केशव विश्वनाथ साळुंके Keshav Vishwanath Salunke (वय-63 रा. ट्वीन टॉवर, म्हस्केवस्ती रोड, रावेत) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव साळुंके हा डेव्हलपर्स असून त्याने महिलेला जागा खरेदी करुन देण्याचे आश्वासन दिले.
महिलेला जागा खरेदी देण्याच्या बहाण्याने केशव साळुंके याने त्यांच्याकडुन बिकींग रक्कम दहा हजार रुपये घेतली. त्यानंतर जागा खरेदी करुन देतो असे सांगून साडे चार लाख रुपये महिलेकडून घेतले. आरोपीने पैसे घेतल्यानंतर जागेचे खरेदीखत करुन दिले नाही. त्यानंतर जागा घेण्याचे रद्द केल्याचा समजुतीचा करारनामा करुन महिलेला 4 लाख 60 हजार रुपयांचा इंडीयन बँकेचा धनादेश दिला. महिलेने धनादेश बँकेत जमा केला असता आरोपीने धनादेश बाऊन्स केला. केशव साळुंके याने जागा तसेच घेतलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
तरुणाची 25 लाखांची फसवणूक
भोसरी : शेअर मार्केटमध्ये जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भोसरी येथे राहणाऱ्या
30 वर्षीय तरुणाला 25 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घातला.
याप्रकरणी तरुणाने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार सुष्मिता भट व जय खटनाना यांच्यावर फसवणुकीचा व आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Uttam Nagar Pune Crime News | पुणे: 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल,
आरोपी गजाआड
Pune Crime News | पुणे: अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ, तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल