Ravi Rana News | भाजपाची ऑफर नाकारली; रवी राणा स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढणार; भाजपापासून लांब राहण्याचे संकेत

Ravi Rana-Devendra Fadnavis

अमरावती : Ravi Rana News | आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) रवी राणा स्वतंत्र निवडणूक लढणार असल्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे. रविवारी अमरावतीमध्ये (Amravati Assembly Constituency) दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेही उपस्थित होते.

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना रवी राणा यांनी मीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा, असा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आग्रह होता. मात्र, मी कधीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही. मी युवा स्वभिमान पक्षात असून पक्षाचे काम ताकदीने करणार आहे, असे सांगून राणा यांनी भाजप प्रवेशाची (BJP) ऑफर नाकारली.

नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत राणा यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आमदार रवी राणा हे सावध पावले टाकत असल्याचे दिसून येत आहे.

कारण लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रात भाजपविरोधात लाट दिसून आली आहे, त्यामुळे राणा हे विधानसभेला भाजपपासून चार हात लांब राहण्याचे संकेत देत आहेत.

२०२९ च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या.
राज्यात सत्तांतर झाल्यावर त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान यंदाच्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. (Ravi Rana News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder Case | कौटुंबिक वादातून वनराज आंदेकर यांचा निर्घुण खून !
जावयानेच आखला खूनाचा कट, गोळीबार करुन कोयत्याने केले वार (CCTV Video)

Andekar Gang History | पुणे : आंदेकर टोळीचा 4 दशकांचा रक्तरंजित इतिहास

Vanraj Andekar Murder Case | पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणी दोघांना (कोमकर बंधूना) अटक

You may have missed