Ravindra Chavan | मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाव? रवींद्र चव्हाण यांचे मोठे भाष्य; म्हणाले – ‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून…’
मुंबई : Ravindra Chavan | महायुती सरकारचा (Mahayuti Govt) ५ डिसेंबरला शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान भाजपाकडून (BJP) मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण आहे? हे जाहीर करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री पदाबाबत अनेक नेत्यांची नावे राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहेत. अशात माजी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाचीही चर्चा होत असून, त्यांनी अमित शहांची (Amit Shah) दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यावर चव्हाण यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
रविंद्र चव्हाण यांनी समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ” गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघातच आहे. सद्यस्थितीत डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहे. या दोन दिवसात किंवा काल मध्यरात्री कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाहीये. त्यामुळे कृपया प्रसार माध्यमांनी कोणत्याही प्रकरणाची शहानिशा करून बातम्या चालवाव्यात, ही नम्र विनंती”, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हंटले आहे.
५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडतोय. शपथविधीची तारीख निश्चित झाली असली,
तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री म्हणून कोण कोण शपथ घेणार?, याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू
Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी