Ravindra Dhangekar Mitra Mandal | चिमुकल्यांनी लुटला बाल दिवाळीचा आनंद ! रवींद्र धंगेकर मित्र मंडळातर्फे ‘आनंद मेळावा’, चेहऱ्यावर फुलले हास्य (Video)

पुणे : Ravindra Dhangekar Mitra Mandal | सनई चौघड्यांचा मंगलमयसूर…. रांगोळ्याच्या पायघड्या… पाटाभोवती केलेली आकर्षक रांगोळी… शाही अभ्यंगस्नान, फराळ आणि नवीन कपडे चिमुकल्यांना मिळाल्याने ‘त्यांचा’ आनंद द्विगुणित झाला. कसबा विधानसभा (Kasba Peth Assembly Election 2024) मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुलांना अभ्यंगस्नान घातले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. (Diwali 2024)
https://www.instagram.com/p/DB0iQXQJWbD
गरजू कुटुंबातील मुला-मुलींना दिवाळीचा आनंद लुटता यावा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी रवींद्र धंगेकर मित्र मंडळातर्फे शुक्रवारी, (दि 1 नोव्हेंबर) सकाळी लोहियानगर येथील म्हसोबा मंदिर जवळील शिवराज चौक येथे ‘बाल दिवाळी आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुला मुलींना उटणे व मोती साबणाने आंघोळ घालून त्यांचे औक्षण केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना नवीन कपडे, फराळ व फटाके देण्यात आले. त्यामुळे चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.
मुलांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी, सादिकभाई शेख, चंदन पाचंगे, सामाजिक कार्यकर्ते सोनूभाई शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. सोनू शेख, नगमा शेख, मालन शिंदे, मोबीना शेख, सेना शेख, हमिदा शेख, सोनिया शेख यांच्यासह स्थानिक महिला-पुरुष देखील उत्साहाने सहभागी झाले होते.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, हा उपक्रम प्रचाराचा भाग नाही.
गेल्या 35 वर्षाहून अधिक सामाजिक व राजकीय काम करताना व सामान्यांशी नाळ जोडली गेली आहे.
सर्वसामान्य गरीब, गरजू नागरिकसोबत दिवाळी साजरी करणे हा खूप मोठा आनंद आहे.
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई इथं जाती-धर्मांचे सण आम्ही साजरे करतो.
वर्षानवर्षे आम्ही सर्व धर्मीय एकमेकांमध्ये मिसळून एकोप्याने सण साजरा करतो.
दिवाळी सणामधील लक्ष्मीपूजन हा महत्त्वाचा सण मानला जातो.
या सणांमध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र येतात. एकमेकांना शुभेच्छा देतात.
एकोपा पुढे नेण्यासाठी, चेहऱ्यावर आनंद दिसण्यासाठी उपक्रमात आम्ही सहभागी होतो.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा