Ravindra Dhangekar On IAS Puja Khedkar | ‘हे आयएएस अधिकारी सिस्टीममधील कलंक, त्यांना सस्पेंड केलं पाहिजे’; आमदार धंगेकर संतापले
पुणे : Ravindra Dhangekar On IAS Puja Khedkar | २०२३ बॅचच्या परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहेत. त्यांची नुकतीच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. दरम्यान खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्याने त्या चर्चेत आहेत . पूजा खेडकर यांच्यावर आमदार रवींद्र धंगेकर यांनीही निशाणा साधला आहे.
रवींद्र धंगेकर म्हणाले, ” हे असे आयएएस अधिकारी सिस्टीम मधले कलंक आहेत. या अधिकाऱ्यांची बदली होऊन काही होणार नाही. त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. या अधिकाऱ्यांच्या वडिलांनी तिचे बोगस सर्टिफिकेट बनवले. तिचे सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट या सगळ्याची तपासणी व्हायला हवी. घरातूनच तिला असे संस्कार मिळाले आणि त्यामुळे तिची वर्तणूक सुद्धा तशीच दिसत आहे. सिस्टीममध्ये अशा एकच पूजा खेडकर नाहीत, इतरही आहेत. पण यांच्यावर कठोर कारवाई केली तरच सिस्टीम योग्य दिशेने जाईल. एक प्रकारे मुजोरी करणारे हे अधिकारी आहेत “, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. (Ravindra Dhangekar On IAS Puja Khedkar)
दरम्यान आज पूजा खेडकर यांना माध्यमांनी प्रश्न विचारले असता त्या म्हणाल्या,
” मला सध्या काहीही बोलण्याची परवानगी नाही. मला वाशिममध्ये रुजू होताना आनंद होतोय.
इथून पुढेही मला वाशिममध्ये काम करायला आवडेल, असे त्यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड