Ravindra Dhangekar On Pune Hit & Run Case | पुण्यातील पुन्हा हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा करा; काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची सरकारकडे मागणी

Ravindra-Dhangekar

पुणे : Ravindra Dhangekar On Pune Hit & Run Case | पुणे-मुंबई महामार्गावर (Pune Mumbai Highway Accident) बोपोडी परिसरात (Policeman Died In Bopodi Accident) आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर शिक्षाअज्ञात वाहनाने रविवारी मध्यरात्री दुचाकीवरील दोन पोलीस मार्शलला धडक दिली. एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना अतिशय धक्कादायक आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

कल्याणी नगरमधील कार अपघात प्रकरण नुकतेच झाले. त्यात दोन निष्पाप तरुणांना जीव गमावावा लागला. त्यांनतर मुंबईतील वरळीत हिट अँड रन प्रकरण घडले. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. आता पुण्यातील बोपोडी भागात एक हिट अँड रन प्रकरण घडले आहे. या पार्श्वभूमीवर धंगेकर बोलत होते. दारूच्या नशेत आणि वेग मर्यादेचे पालन न करता वाहन चालविणाऱ्या चालकांवर कडक कारवाई झाली पाहिजे. यासाठी कठोर कायदा आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आपले कर्तव्य बजावून घरी जात असताना या घटनेत जे पोलिस कर्मचारी मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, कुटुंबियातील सदस्यांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, अशा मागण्या मी सरकारकडे केल्या आहेत. रात्र-दिवस समाजाची सुरक्षा करणारे पोलिस कर्मचारी हिट अँड रनचे बळी ठरतात, हे अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारे आहे. मुंबईमध्येही अशी घटना घडली. राज्यात पब संस्कृती फोफावत चालली आहे. येथे दारू पासून ड्रग्ज पर्यंतचे पदार्थ मिळत आहेत. यातून रात्रीच्या वेळी अपघात वाढत आहेत. म्हणून पब संस्कृती थांबवण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे, पब कायमचे बंद केले पाहिजे, अशी माझी मागणी आहे, असे धंगेकर यांनी सांगितले. (Ravindra Dhangekar On Pune Hit & Run Case)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed